महिला आणि बालविकास मंत्रालय

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 'सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0'– एकीकृत पोषण सहाय्यता कार्यक्रमाचे दिशानिर्देश केले जारी

Posted On: 02 AUG 2022 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 'सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0' च्या अंमलबजावणीबाबत परिचालन दिशानिर्देश जारी केले आहेत. ही योजना भारत सरकारने 2021-22 ते 2025-26 या कालावधीत 15 व्या वित्त आयोगाच्या कालावधीत अंमलबजावणीसाठी मंजूर केली आहे.

सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम आहे. पोषण सामग्री आणि वितरणात धोरणात्मक बदल करून मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यातील कुपोषणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा हा प्रयत्न आहे. आरोग्य, कल्याण आणि प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पद्धती विकसित करण्याचा तसेच प्रोत्साहन देण्यासाठी एक सुसंगत परिसंस्था निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे.

विद्यमान पोषण कार्यक्रमातील विविध तफावत आणि त्रुटी दूर करण्यासाठी, अंमलबजावणी सुधारण्यासाठी तसेच पोषण आणि बाल विकास परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठी, विद्यमान योजना घटकांची खालील प्रमुख क्षेत्रांमध्ये पोषण 2.0 अंतर्गत पुनर्रचना करण्यात आली आहे:

  • आकांक्षी जिल्हे आणि पूर्वोत्तर क्षेत्रात पूरक पोषण कार्यक्रमा अंतर्गत (एसएनपी) 06 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता (पीडब्लूएलएम) आणि 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी (एनईआर) पोषणासाठी पोषण सहाय्य;
  • प्रारंभिक बाल्यावस्था देखभाल  आणि शिक्षण [3-6 वर्षे] आणि प्रारंभिक प्रोत्साहन (0-3 वर्षे);
  • आधुनिक, अत्याधुनिक अंगणवाड्यांसह अंगणवाडी पायाभूत सुविधा;  आणि
  • पोषण अभियान

 

पोषण 2.0 ची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :-

  • देशाच्या मानवी भांडवलाच्या विकासात योगदान देण्यासाठी;
  • कुपोषणाच्या आव्हानांवर तोडगा शोधणे;
  • शाश्वत आरोग्य आणि कल्याणासाठी पोषण जागरूकता आणि चांगल्या खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे;  आणि
  • मुख्य धोरणांद्वारे पोषणा संबंधित त्रुटी  दूर करणे.

पोषण 2.0 मातेचे पोषण, अर्भक आणि लहान मुलांचे आहाराचे मापदंड, एसएएम/एमएएम साठी उपचारांबाबतची कार्यपद्धती आणि आयुष पद्धतींद्वारे संपूर्ण आरोग्यासाठी स्टंटिंग आणि अशक्तपणाशिवाय कमी वजनाच्या प्रचलनासाठी, ''पोषण ट्रॅकर' द्वारे समर्थित वर लक्ष केन्द्रित करेल. 

एक नवीन, मजबूत आईसीटी केंद्रीकृत डेटा प्रणाली जी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरसीएच पोर्टलशी (अनमोल) जोडली जात आहे.

'सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0' - चे विस्तृत दिशानिर्देश इथे उपलब्ध आहेत: -

https://wcd.nic.in/acts/guidelines-mission-saksham-anganwadi-and-poshan-20

 

* * *

S.Bedekar/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1847879) Visitor Counter : 386