कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
स्किल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत खेळांचा विकास
Posted On:
01 AUG 2022 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2022
राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन (NSDM) ची सुरुवात माननीय पंतप्रधानांनी 15 जुलै 2015 रोजी केली होती, ज्या अंतर्गत क्रीडा क्षेत्रासह इतर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रयत्नांची अंमलबजावणी आणि विस्तार करण्यासाठी एक मजबूत संस्थात्मक आराखडा उपलब्ध करून देण्यात आला.
या अंतर्गत, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) आपली प्रमुख योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) राबवत आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत, क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रात कौशल्य प्रदान केले जाते. क्रीडा क्षेत्रासाठी विकसित केलेले पात्रता संच म्हणजे अर्ली इयर्स फिजिकल अॅक्टिव्हिटी फॅसिलिटेटर, प्राइमरी इयर्स फिजिकल ॲक्टिव्हिटी फॅसिलिटेटर, स्पोर्ट्स मॅस्युअर, फिटनेस ट्रेनर, कम्युनिटी स्पोर्ट्स कोच, नि:शस्त्र सेल्फ-डिफेन्स इंस्ट्रक्टर, पर्सनल फिटनेस ट्रेनर, ग्रुप फिटनेस ट्रेनर, स्ट्रेंग्थ आणि कंडीशनींग प्रशिक्षक, फिटनेस सेंटर हेड, लाइफगार्ड पूल, लाईफगार्ड ओपन वॉटर, एक्वाटिक रेस्क्यू हेड, स्विमिंग इंस्ट्रक्टर, बीच कॅप्टन आणि पूल मेंटेनन्स वर्कर. 30.06.2022 पर्यंत, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत एकूण 91,007 उमेदवारांना क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे.
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) मार्फत, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने स्किल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत खेळांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 3 जुलै 2015 रोजी स्पोर्ट्स, फिजिकल एज्युकेशन, फिटनेस आणि लेझर स्किल्स कौन्सिल (SPEFL-SC) ची स्थापना केली. SPEFL-SC चा मुख्य उद्देश देशातील क्रीडा क्षेत्रात दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी एक मजबूत आणि उत्स्फूर्त परिसंस्था तयार करणे हा आहे. इतर बाबींसह कार्यात्मक आणि व्यावसायिक आरेखन पार पाडणे, उद्योगाची यादी विकसित करणे, या क्षेत्रातील व्यवसाय/ नोकरी विकसित करणे, प्रशिक्षक, मूल्यांकनकर्ते आणि प्रशिक्षणार्थी यांचे मुल्यांकन तसेच त्यांच्यासाठी प्रमाणन यंत्रणा विकसित करुन ती स्थापित करणे, ही स्पोर्ट्स, फिजिकल एज्युकेशन, फिटनेस आणि लेझर स्किल्स परिषदेची मुख्य कामे आहेत. ही एक सतत आणि निरंतर प्रक्रिया आहे. क्रीडा क्षेत्रासाठी अद्याप कौशल्य- तफावतीचा अभ्यास हाती घेण्यात आलेला नाही.
कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847159)
Visitor Counter : 167