पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत निधीचे वितरण आणि वापर
Posted On:
01 AUG 2022 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2022
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जानेवारी 2019 मध्ये सुरू केलेला, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम हा वायू प्रदूषण प्रतिबंधासाठी नियंत्रणासाठी आणि ते कमी करण्यासाठी एक दीर्घकालीन, कालबद्ध, राष्ट्रीय स्तरावरील धोरण आहे.राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत, देशभरात 2024 पर्यंत प्रदूषणकारी घटकांच्या प्रमाणात 20 ते 30% घट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याची संकल्पना या कार्यक्रमात मांडण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष 2019-20, 2020-21 आणि 2021-2022 साठी निधीचे राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि शहरनिहाय वितरण आणि वापर यांचा तपशील परिशिष्ट I मध्ये संलग्न केला आहे.
शहरांमध्ये कृती योजनांच्या अंमलबजावणीसाठी शहरांना निधी वितरीत केला जातो या कृती योजनांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्याचे उपाय, स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता बांधणी आणि माहिती, शिक्षण आणि दळणवळण उपक्रम (आयईसी ) याचा समावेश आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत निधी प्राप्त न झालेल्या ईशान्य प्रदेशातील राज्यांमध्ये असलेल्या शहरांना 2019 पासून वाटप केलेल्या निधीचा तपशील परिशिष्ट I मध्ये आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत, 132 शहरांनी शहर कृती आराखडे सादर केले असून त्यांना मंजुरी मिळाली आहे. सर्व शहरांना राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम निधी आणि/किंवा पंधराव्या वित्त आयोगाचा निधी एमपीसीसीएफ हवा गुणवत्ता कामगिरी अनुदानाद्वारे निधी देण्यात आला आहे.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847109)
Visitor Counter : 208