आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएमए) एक निश्चित दिवस, मोफत, खात्रीशीर, सर्वसमावेशक आणि दर्जेदार प्रसूती-पूर्व देखभाल प्रदान करते


पीएमएसएमए अंतर्गत, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना देखील सरकारी आरोग्य सुविधांमध्ये ऐच्छिक सेवा देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते

प्रविष्टि तिथि: 26 JUL 2022 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2022

 

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएमए) गरोदर महिलांना त्यांच्या गरोदर पणाच्या 2 ऱ्या/3 ऱ्या तिमाहीत दर महिन्याच्या 9 तारखेला, म्हणजेच एका निश्चित दिवशी, निर्धारित करण्यात आलेल्या सरकारी आरोग्य सुविधा केंद्रात मोफत, खात्रीशीर, सर्वसमावेशक आणि दर्जेदार प्रसूती-पूर्व देखभाल  प्रदान करते. पीएमएसएमए कार्यक्रमा अंतर्गत, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना देखील सरकारी आरोग्य सुविधांमध्ये ऐच्छिक सेवा देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. गरीब तसेच शेतकरी कुटुंबांमधील महिलांसह सर्व गरोदर महिलांना दर महिन्याच्या 9 व्या दिवशी एकूण 2937 स्वयंसेवक पीएमएसएमए सेवा देत आहेत   (संदर्भ: पीएमएसएमए पोर्टल). सरकार अशा खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना ‘IPledgeFor9’ Achievers Awards देऊन सन्मानित करते.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरामधून ही माहिती दिली.


* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1845166) आगंतुक पटल : 191
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu