गृह मंत्रालय

जनगणना 2021

Posted On: 26 JUL 2022 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2022


जनगणना 2021 आयोजित करण्याचा सरकारचा हेतू 28 मार्च 2019 रोजी भारताच्या राजपत्रात अधिसूचित करण्यात आला होता. कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे, जनगणना 2021 आणि संबंधित प्रत्यक्ष उपक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. आगामी जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना असेल. डेटा संकलित करण्यासाठी मोबाइल अॅप्स आणि जनगणनेशी संबंधित विविध उपक्रमांचे व्यवस्थापन आणि देखरेख करण्यासाठी जनगणना पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

जनगणनेमध्ये, संविधान (अनुसूचित जाती) आदेश, 1950 आणि संविधान (अनुसूचित जमाती) आदेश, 1950 अन्वये, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणून विशेषत: अधिसूचित केलेल्या जाती आणि जमातींची गणना केली जाते. बिहार, महाराष्ट्र आणि ओदिशा राज्य सरकारांनी आगामी जनगणनेमध्ये जातविषयक तपशील गोळा करण्याची विनंती केली आहे. भारत सरकारने स्वातंत्र्यानंतरच्या जनगणनांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींव्यतिरिक्त इतर लोकसंख्येची जातीनिहाय गणना केलेली नाही.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1845102) Visitor Counter : 193


Read this release in: English , Urdu