संरक्षण मंत्रालय
‘आत्मनिर्भर भारत’: सशस्त्र दलांसाठी सॉफ्टवेअर डिफाईंड रेडिओच्या स्वदेशीकरणाला संरक्षण मंत्रालयाचे सर्वोच्च प्राधान्य
Posted On:
26 JUL 2022 10:20AM by PIB Mumbai
सशस्त्र दलांकडून वाढती मागणी लक्षात घेता, संरक्षण मंत्रालयाने सॉफ्टवेअर डिफाईंड रेडिओचे (एसडीआरएस) स्वदेशीकरण जलदगतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूर यासारख्या मातबर संस्थाचे विशेष योगदान आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेले एसडीआर तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. यामध्ये स्वदेशी स्वयं-शाश्वत संरचना, विकास, उत्पादन, चाचणी/प्रमाणीकरण आणि देखभाल परिसंस्थेचा समावेश आहे.
एसडीआर तंत्रज्ञानाच्या स्वदेशीकरणाला उच्च प्राधान्य देत, सुरक्षित रेडिओ संप्रेषणाच्या क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारता' ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी सांगितले.
स्वदेशी एसडीआर तंत्रज्ञानाचे दोन प्रमुख घटक आहेत. एक म्हणजे प्रमाणित ऑपरेटिंग सॉफ्टवेअर एनव्हॉरमेंट (ओई) आणि संबंधित वेव्हफॉर्म्स रिपॉझिटरी आणि चाचणी/प्रमाणीकरण सुविधा असलेले अनुप्रयोग (वेव्हफॉर्म म्हणूनही ओळखले जाते). प्रमाणित ओई अनेक विक्रेत्यांच्या एसडीआर मध्ये वेव्हफॉर्म पोर्टेबिलिटी आणि परस्परातील कार्यव्यवहाराला सक्षम करते.
संरक्षण मंत्रालयाने या दिशेने,
इंडिया सॉफ्टवेअर कम्युनिकेशन आर्किटेक्चर (एससीए) प्रोफाइल किंवा इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर नावाच्या भारतासाठीच्या विशेष कार्यप्रणाली वातावरणाच्या संदर्भात अंमलबजावणीची संज्ञा सुनिश्चित करणे आणि विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.
संरक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या एससीए समितीचे अध्यक्ष,
कानपूर आयआयटीचे संचालक डॉ. अभय करंदीकर आहेत. 'इंडिया एससीए प्रोफाईलची' संकल्पना त्यांनी मांडली आहे. पथदर्शक आराखडा आणि कालमर्यादेसह एसडीआरच्या स्वदेशी विकासासाठी डीईएएल/डीआरडीओद्वारे मसुदा प्रकल्प अहवाल (डीपीआरDPR) तयार केला गेला आहे.
विकासात सहभागी असलेल्या
डीईएल/डीआरडीओ, आयआयटी-कानपूर आणि डीओएस या तीन संस्थांनी डीपीआरनुसार आधीच काम सुरू केले आहे. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी सर्व संस्थावर विश्वास व्यक्त केला.
आतापर्यंत आयात केल्या जाणाऱ्या महत्वाच्या उपकरणांच्या स्वदेशीकरणासाठी एक नवीन आदर्श ते घालून देतील असे त्यांनी यावेळी म्हटले. यामुळे ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल, आयातीवर खर्च होणाऱ्या पैशाची बचत होईल आणि सशस्त्र दलांसाठी सुरक्षित रेडिओ नेटवर्क निर्माण होईल. ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
***
MI/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844884)
Visitor Counter : 218