कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळावा

Posted On: 25 JUL 2022 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जुलै 2022

 

केंद्र सरकारने देशभरात विविध ठिकाणी मासिक तत्वावर पीएमएनएएम अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशिप) मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील 257 जिल्ह्यांमध्ये (एकंदर जिल्ह्यांपैकी 1/3 जिल्हे) प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हे मेळावे आयोजित करण्याचे निर्देश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले असून, मेळाव्याचे ठिकाण निवडण्याचे तसेच स्थानिक परिस्थिती, उत्सव यांचा विचार करून मेळाव्याचा दिवस निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले आहे. आतापर्यंत जून आणि जुलै अशा दोन महिन्यात मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पीएमएनएएम लागू करण्यात आलेल्या आंध्रप्रदेश राज्यासह ज्या जिल्ह्यांमध्ये हे मेळावे भरविण्यात येणार आहेत त्यांची राज्यनिहाय संख्या परिशिष्ट 1 मध्ये दिली आहे. वयाची 14 वर्षे पूर्ण (धोकादायक उद्योगांसाठी 18 वर्षे पूर्ण) आणि व्यवसायाच्या स्वरूपानुसार शारीरिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञानविषयक पात्रता प्राप्त असणे असे’ या उमेदवारीसाठीच्या निवडीचा निकष आहेत.

या शिकाऊ उमेदवारी मेळाव्याच्या आयोजनाला  सरकारी माध्यमांद्वारे जसे पत्रसूचना कार्यालय, दूरदर्शन, कम्युनिटी रेडीओ, आकाशवाणी, मायजीओव्ही सारखे समाजमाध्यम मंच  तसेच छापील माध्यमे, डिजिटल माध्यमे (लघुसंदेश), स्थानिक पातळीवर आयटीआयसारख्या संस्थांच्या माध्यमातून राज्य अथवा जिल्हा पातळीवरील सक्रीय सहभाग, पत्रके, शाळा-महाविद्यालयांमध्ये माहितीचा प्रसार, विभागीय कौशल्य मंडळे त्रयस्थ संस्था (टीपीए) तसेच प्रादेशिक कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालये आणि स्थानिक औद्योगिक संस्था यांच्यातर्फे प्रसिद्धी देण्यात येत आहे.

शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून दर वर्षी देशातील 10 लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी आस्थापना आणि उमेदवार यांच्या सक्रीय सहभागासाठीचा मंच म्हणून पीएमएनएएम हा कार्यक्रम उपयुक्त ठरत आहे आणि अशा मेळाव्यांच्या माध्यमातून सहभागी कंपन्यांमध्ये असणाऱ्या संधींबाबत युवकांमध्ये जागरुकता देखील निर्माण होण्यास मदत होत आहे. गेल्या दोन मेळाव्यांमध्ये सहभागी झालेल्या आस्थापनांचे तपशील, सहभागी युवक आणि  रोजगारविषयक करार यांचा तपशील खाली दिला आहे:

Mela Date

No of districts/ location

No. of Establishment Registered

No. of Candidates Registered

No of contracts generated

13-June-2022

195

1485

81,992

24,875

 

11-July-2022

212

1466

84,232

23,199

 

Annexure-1

(For UN-STARRED QUESTION NO: 1217TO BE ANSWERED ON 25-07-2022)

Pradhan Mantri National Apprenticeship Mela (PMNAM)

S#

State / UT

Number of Districts/ location

1

Andhra Pradesh

9

2

Arunachal Pradesh

8

3

Assam

11

4

Bihar

13

5

Chhattisgarh

11

6

Goa

1

7

Gujarat

11

8

Haryana

7

9

Himachal Pradesh

4

10

Jharkhand

8

11

Karnataka

10

12

Kerala

5

13

Madhya Pradesh

18

14

Maharashtra

12

15

Manipur

5

16

Meghalaya

4

17

Mizoram

4

18

Nagaland

5

19

Odisha

10

20

Punjab

8

21

Rajasthan

11

22

Sikkim

2

23

Tamil Nadu

13

24

Telangana

11

25

Tripura

3

26

Uttar Pradesh

25

27

Uttarakhand

4

28

West Bengal

8

29

Andaman and Nicobar

1

30

Chandigarh

1

31

Dadra and Nagar Haveli and Daman and Diu

1

32

Delhi

4

33

Jammu and Kashmir

6

34

Lakshadweep

1

35

Ladakh

1

36

Puducherry

1

 

Total

257

 

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1844787) Visitor Counter : 214


Read this release in: English , Urdu