नागरी उड्डाण मंत्रालय
एएआयअर्थात भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे कोल्हापूर विमानतळ परिसरात रात्रीच्या वेळी विमान उतरवण्यासाठीच्या सुविधांची उभारणी
Posted On:
25 JUL 2022 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2022
विमानतळांचे अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरण तसेच रात्रीच्या वेळी विमान उतरविण्यासाठीच्या सुविधा उभारणे ही सतत सुरु राहणारी प्रक्रिया असून जमिनीची उपलब्धता, व्यावसायिक व्यवहार्यता, आर्थिक-सामाजिक विचारप्रवाह, वाहतुकीच्या दृष्टीने गरज तसेच या विमानतळांवरील आवागमनाबाबत विमान कंपन्यांची इच्छा यांच्या अनुकुलतेनुसार एएआय अर्थात विमानतळ प्राधिकरण आणि इतर विमानतळ परिचालक यांच्यातर्फे ही कामे हाती घेतली जातात.
सध्याच्या काळात रात्रीच्या वेळी विमानतळांवर विमाने उतरविण्याची सोय करण्याची मागणी वेगाने वाढत आहे आणि विमान कंपन्यांच्या गरजेवर आधारित परिचालन सुविधा तसेच जमिनीची उपलब्धता या दोन्ही बाबी, वेळापत्रकानुसार विमानोड्डाणे सुरु असणाऱ्या ज्या 25 कार्यान्वित विमानतळांवर उपलब्ध नाही त्यांची माहिती परिशिष्टामध्ये दिली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळ परिसरात रात्रीच्या वेळी विमाने उतरविण्यासाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. डीजीसीए अर्थात नागरी हवाई उड्डाण महासंचालनालयाच्या पथकाने 10 जून 2022 रोजी विमानतळाचे परिक्षण केले आहे. या परिक्षणादरम्यान डीजीसीएने नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार नियम पालनाबाबत प्राधिकरणाने या आधीच कार्यवाही सुरु केली आहे.
परिशिष्ट
वेळापत्रकानुसार विमानउड्डाणे होणारे पण रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची सोय नसलेले विमानतळ
S.No.
|
State
|
Nameoftheairport
|
1.
|
AndhraPradesh
|
Cudappah
|
2.
|
Kurnool
|
3.
|
Assam
|
Rupsi
|
4.
|
ArunachalPradesh
|
Tezu
|
5.
|
Passighat
|
6.
|
Chhattisgarh
|
Bilaspur
|
7.
|
Jagdalpur
|
8.
|
Daman&Diu
|
Diu
|
9.
|
Gujarat
|
Keshod
|
10.
|
Haryana
|
Hisar
|
11.
|
HimachalPradesh
|
Dharamshala
|
12.
|
Kullu
|
13.
|
Shimla
|
14.
|
Jharkhand
|
Deoghar
|
15.
|
Karnataka
|
Kalaburagi
|
16.
|
Lakshadweep
|
Agatti
|
17.
|
Maharashtra
|
Kolhapur
|
18.
|
Sindhudurg
|
19.
|
Punjab
|
Ludhiana
|
20.
|
Puducherry
|
Puducherry
|
21.
|
Sikkim
|
Pakyong
|
22.
|
TamilNadu
|
Salem
|
23.
|
Uttarakhand
|
Pantnagar
|
24.
|
Pithoragarh
|
25.
|
UttarPradesh
|
Kushinagar
|
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री (जनरल (डॉ.) )व्हि.के.सिंग (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
* * *
S.Kakade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844698)
Visitor Counter : 71