संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

परदेशांकडून खरेदी करण्यासाठी नवीन बँकिंग धोरण

प्रविष्टि तिथि: 25 JUL 2022 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जुलै 2022

 

सरकारी कामकाजाचे वाटप खासगी क्षेत्रातील बँकांना खुले करण्याचा  करण्याचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने  एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अक्सिस बँक यांना,  मंत्राल़याकडून परदेशांतील खरेदीबाबत पतपत्र (लेटर ऑफ क्रेडिट) आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) यांच्या स्वरूपात वित्तीय सेवा पुरवण्याबाबत नियुक्त केले आहे. आतापर्यंत, केवळ प्राधिकृत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचाच उपयोग या सेवा पुरवण्यासाठी मंत्रालयाकडून करण्यात येत होता. पतपत्र आणि थेट लाभ हस्तांतरण या स्वरूपातील व्यवसाय खासगी क्षेत्रातील बँकांना पुरवल्यामुळे बँकांमध्ये अधिक निकोप स्पर्धा आणि कार्यक्षमता आणली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्यसभेत आज संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी गीता तथा चंद्रप्रभा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/U.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1844618) आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Malayalam