नौवहन मंत्रालय
प्रमुख बंदरांनी रो-पॅक्स/प्रवासी बोटींना बंदर आणि जहाजाशी संबंधित शुल्क भरण्यापासून पुढील 6 महिने सूट दिली
नौवहन मंत्रालयाने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि अर्थमंत्रालयाला केली जहाजाच्या इंधनाचे दर आणि त्यावरील कर कमी करण्याची विनंती
Posted On:
24 JUL 2022 4:17PM by PIB Mumbai
बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय रो-रो/ रो-पॅक्स/फेरी द्वारे जलमार्ग वाहतुकीला प्रोत्साहन देत असून त्यामध्ये समान प्रमाणातील माल वाहतुकीच्या अन्य मार्गांच्या तुलनेत कमी उत्सर्जन होते. तसेच पारंपरिक वाहतूक पद्धतींच्या तुलनेत वेळ आणि खर्चात लक्षणीय बचत होते. त्याच बरोबर रस्ते/रेल्वे मार्गावरील वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण आणि रस्ते अपघात देखील कमी होतील. अशा स्वरुपाची जल-मार्ग वाहतूक सेवा लॉजीस्टिकचा खर्च कमी करण्यासाठी, प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आणि किनाऱ्यावरील जहाज सेवेला प्रोत्साहन देण्यासाठीचा एक प्रभावी उपाय आहे.
इंधनाच्या जागतिक दर वाढीपासून या क्षेत्राला थोडासा दिलासा देण्यासाठी, नौवहन मंत्रालयाने सर्व प्रमुख बंदरांना रो-पॅक्स/प्रवासी फेरी बोटींना आकारले जाणारे बर्थचे भाडे आणि जहाजाशी संबंधित शुल्कामध्ये पुढील सहा महिने सूट तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
जहाजांसाठीचे इंधन लो सल्फर फ्यूएल ऑईल (LSHFHSD) या सागरी इंधनाची किंमत 76,000/किलो लिटर (KL) रुपयांवरून वरून 1,21,000/ KL रुपये इतकी वाढली आहे. त्याचप्रमाणे, ‘व्हेरी लो सल्फर फ्यूएल ऑईल ’(VLSFO) ची किंमत देखील 40608/KL वरून 80917/KL वर गेली आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की आर्थिक वर्ष 2021-22 च्या सुरुवातीला एलएसएफएसडी या सागरी इंधनाची किंमत डीझेल-HSD च्या किरकोळ भावाच्या तुलनेत 10-15% कमी असायची. त्यामुळे प्रभावीपणे झालेली वाढ 40% पेक्षा जास्त आहे.
सागरी इंधनाची दर वाढ आणि जीएसचीच्या प्रवासी जहाज वाहतुकीवरील प्रभावाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी नुकतीच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे (जी पी विभाग) सह सचिव नवनीत मोहन कोठारी, महसूल विभाग आणि अर्थ मंत्रालयाचे सह सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या संदर्भात त्यांनी केंद्रय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांना पत्र देखील लिहिले असून त्यामध्ये या समस्येवर प्रकाश टाकला असून इंधनाच्या किमती आणि त्यावरील कर कमी करून त्यांनी या क्षेत्राला सहाय्य करावे अशी विनंती केली आहे. सर्व राज्यांनी हे क्षेत्र वापरत असलेल्या HSD वरील VAT चा दर कमी करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
सागरमाला कार्यक्रमा अंतर्गत दीनदयाल बंदर प्राधिकरणाने घोगा आणि हझीरा दरम्यान सुरु केलेल्या रो-पॅक्स सेवेमुळे प्रवासाचा वेळ 12 तासांवरून 4 तास इतका कमी झाला आहे. ही रो-पॅक्स सेवा सुरु झाल्यापासून आतापर्यंत 78,000 वाहने आणि 2.6 लाख प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे. तसेच, महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाने मुंबई-मांडवा दरम्यान रो-पॅक्स प्रवासी सेवा सुरु केली आहे. या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा अंदाजे 3 तासांचा वेळ वाचला असून सागरी मार्गे तो 45 मिनिटांवर आला आहे. आतापर्यंत 5.5 लाखाहून जास्त प्रवाशांनी या रो-पॅक्स सेवेचा लाभ घेतला असून या सेवे द्वारे 1 लाखाहून जास्त वाहनांची वाहतूक करण्यात आली.
***
S.Thakur/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844403)
अभ्यागत कक्ष : 215