भूविज्ञान मंत्रालय
इंडियन मर्चंट्स चेंबर (IMC) च्या अध्यक्षांनी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांची भेट घेत, भूविज्ञान मंत्रालयाने सुरू केलेल्या 75 दिवसांच्या किनारपट्टी स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबई समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छता अभियानाला दिला पाठिंबा
Posted On:
23 JUL 2022 7:03PM by PIB Mumbai
इंडियन मर्चंट्स चेंबर (IMC) चे अध्यक्ष तसेच जे.के. एंटरप्रायझेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत सिंघानिया यांनी आज केंद्रीय भूविज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग भेट घेतली आणि भूविज्ञान मंत्रालयाने या वर्षी 5 जुलैपासून सुरू केलेल्या 75 दिवसांच्या किनारपट्टी स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबई समुद्र किनारा स्वच्छता अभियानाला पाठिंबा दिला.
याप्रसंगी आयएमसीच्या व्यवस्थापकीय समिती सदस्य देखील सिंघानिया यांच्याबरोबर उपस्थित होते. सिंघानिया यांनी सांगितले की, त्यांनी केवळ मोहिमेत सामील होण्याचेच वचन दिले नाही तर “क्वीन नेकलेस” या लोकप्रिय नावाने ज्ञात असलेल्या मरिन ड्राईव्ह या समुद्र किनाऱ्याच्या पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण या कामात त्यांची संसाधने देखील वापरासाठी देण्याचे वचन दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिमेत पुढाकार घेतला आहे आणि भारताची 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी, मानवजातीसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी संपूर्ण देशाला प्रेरित केले आहे, असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. पंतप्रधान मोदी हे आदर्श नेतृत्वासाठी ओळखले जातात, त्यांच्या नेतृत्वाचा परिणाम म्हणून हा उपक्रम हळूहळू व्यापक मोहिमेत विकसित झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
येत्या 17 सप्टेंबर 2022 रोजी साजऱ्या होणाऱ्या "आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनी, योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसही आला आहे. हा दिवस देशभर सेवा दिन म्हणून साजरा केला जातो, असे दुहेरी औचित्य साधत समुद्र किनाऱ्यावरून 1,500 टन कचरा, मुख्यतः एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक गोळा करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व समाज घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ जितेंद्र सिंह यांनी केले आहे.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाला सिंघानिया यांनी पूर्ण पाठिंबा दिला आणि मंत्र्यांना आश्वासन दिले की इंडियन मर्चंट्स चेंबर मुंबई किनारा क्षेत्रात समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता उपक्रमांसाठी भूविज्ञान मंत्रालयाच्या समन्वयाने अनेक उपक्रम हाती घेईल.
डॉ जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की, यावर्षी एप्रिलमध्ये, देशातील सर्वात मोठे समुद्रकिनारे आणि जलस्रोत स्वच्छ करण्याचा स्वयंसेवी महोत्सव 'जल्लोष-स्वच्छ किनारा' मुंबई आणि नवी मुंबईतील 16 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाची सुरुवात 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिनानिमित्त दादर समुद्रकिनाऱ्यापासून झाली. या सहयोगी कृती योजनेत हजारो मुंबईकरांचे विविध गट, मुले आणि युवा मंच, व्यावसायिक संस्था, स्वयंसेवी संस्था, परराष्ट्र वकिलातीतील कर्मचारी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) आणि महाराष्ट्र सरकारच्या कांदळवन फाउंडेशनमधील कर्मचारी सामील झाले होते.
***
R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844237)
Visitor Counter : 151