भूविज्ञान मंत्रालय
लोकसभेने भारतीय अंटार्क्टिक विधेयक 2022 केले मंजूर; अंटार्क्टिक पर्यावरण तसेच त्याच्यावर अवलंबून आणि निगडीत परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी भारताच्या स्वतःच्या राष्ट्रीय उपाययोजना असाव्यात हे यामागील उद्दिष्ट
विधेयकामध्ये सर्वोच्च निर्णय घेणारे प्राधिकरण म्हणून पृथ्वी विज्ञान मंत्रालया अंतर्गत भारतीय अंटार्क्टिक प्राधिकरणाची (IAA) स्थापना करण्याचा प्रस्ताव: डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती
Posted On:
22 JUL 2022 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2022
लोकसभेने आज पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मांडलेले भारतीय अंटार्क्टिक विधेयक 2022 मंजूर केले. अंटार्क्टिक पर्यावरण तसेच त्याच्यावर अवलंबून आणि निगडित परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी भारताच्या स्वतःच्या राष्ट्रीय उपाययोजना असाव्यात हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे.
या विधेयकाबाबत माहिती देताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, या प्रदेशाचे निर्लष्करीकरण सुनिश्चित करणे यासह अवैध खाणकाम आणि बेकायदेशीर कृत्यांपासून त्याची मुक्तता करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रदेशात कोणतीही अणु चाचणी/स्फोट होऊ नयेत हे देखील या विधेयकाचे उद्दिष्ट आहे.
हे विधेयक अंटार्क्टिक करारामधील भारताचा प्रवेश, अंटार्क्टिक कराराच्या पर्यावरण रक्षणाबाबतचा प्रोटोकॉल (माद्रिद प्रोटोकॉल) आणि अंटार्क्टिक सागरी जीव संसाधनांचे संवर्धन याबाबतच्या परिषदेच्या अनुषंगाने आहे.
हे विधेयक सुस्थापित कायदेशीर यंत्रणेच्या माध्यमातून भारताच्या अंटार्क्टिक कार्यक्रमांसाठी सामंजस्यपूर्ण धोरण आणि नियामक चौकट प्रदान करत असून ते भारताच्या अंटार्क्टिक कार्यक्रमांच्या कार्यक्षम आणि निवडक कार्याला मदत करेल, हे डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले. अंटार्क्टिकामधील वाढते पर्यटन आणि अंटार्क्टिक पाण्यातील मत्स्यपालन संसाधन विकासाचे व्यवस्थापन यामधील भारताचे हित आणि सक्रीय सहभाग याला देखील सहाय्य हे करेल. हे विधेयक वाढती आंतरराष्ट्रीय दृश्यमानता, ध्रुवीय व्यवस्थापनामधील भारताची विश्वासार्हता वाढवायला देखील मदत करेल, ज्यामुळे वैज्ञानिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहयोग आणि सहकार्य वाढेल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844054)
Visitor Counter : 440