रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रुग्णांकरता परवडण्याजोगी वैद्यकीय उपकरणे

Posted On: 22 JUL 2022 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री – जन आरोग्य योजनेची  (ABPM-JAY) अंमलबजावणी बंधनकारक केली आहे. ही योजना पात्र लाभार्थी  कुटुंबाना प्रति कुटुंब वार्षिक  5 लाख रुपयांचे  आरोग्य कवच प्रदान करते.  यामध्ये 27 प्रकारांमधील 1,949 उपचार प्रक्रियेशी संबंधित द्वितीयक आणि तृतीयक देखभालीसाठी  रुग्णालयात दाखल करण्याची तरतूद आहे.

औषधनिर्माण विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने  13 फेब्रुवारी 2017 रोजी ड्रग्ज (किंमत नियंत्रण) आदेश, 2013 मधील तरतुदींनुसार बेअर मेटल स्टेंट्स आणि ड्रग इल्युटिंग स्टेंट्सची कमाल मर्यादा बेअर मेटल स्टेंटसाठी 7,260 रुपये  आणि ड्रग इल्युटिंग स्टेंट्ससाठी 29,600 रुपये  इतकी निश्चित केली होती (BVS/ जैव विघटनकारी घटक  यांचा यात  समावेश आहे.) 30 मार्च 2022 पासून कोरोनरी स्टेंटसाठी घाऊक किंमत  निर्देशाकातील सुधारणेवर आधारित वर्तमान कमाल मर्यादा खालीलप्रमाणे आहे:

Sl. No

Type

Ceiling Price

1

Bare Metal Stents (BMS)

Rs. 9,373.03/-

2

Drug Eluting Stents (DES) including metallic DES And  Bioresorbable Vascular Scaffold (BVS)/Biodegradable Stents

Rs. 34,128.13/-

रुग्णालये  रुग्णांकडून राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने  निश्चित केलेल्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक रक्कम आकारू शकत नाही. याशिवाय वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता निश्चित करण्यासाठी आणि त्यांचे दर परवडण्याजोगे असावेत यादृष्टीने, राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने  13 जुलै 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे पल्स ऑक्सिमीटर, ग्लुकोमीटर, बीपी मॉनिटर, नेब्युलायझर आणि डिजिटल थर्मामीटर या वैद्यकीय उपकरणांच्या घाऊक आणि किरकोळ विक्रीतील किमतीमधील फरक  मर्यादित केला  आहे.

 

 S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1843999)
Read this release in: English , Urdu