सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे नोकऱ्यांची निर्मिती
Posted On:
21 JUL 2022 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2022
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, खादी आणि ग्रामोद्योग आयोगा (KVIC) च्या माध्यमातून, खादी आणि ग्रामोद्योग निर्मित वस्तूंच्या उत्पादनात आणि विक्रीमध्ये गुंतलेल्या खादी आणि ग्रामोद्योगांना प्रोत्साहन आणि सहाय्य करते, त्यामुळे विविध योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीद्वारे ग्रामीण कारागिरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
महाराष्ट्र राज्यात 31.03.2022 पर्यंत खादी आणि ग्रामोद्योगाद्वारे निर्माण झालेले एकत्रित रोजगार खाली दिले आहेत:
Year
|
Cumulative Employment in Maharashtra State
(in lakh persons)
|
Khadi
|
Village Industries
|
KVI
|
As on 31.03.2022 (Provisional)
|
0.03
|
11.65
|
11.68
|
याशिवाय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) द्वारे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) राबवत आहे, जो एक प्रमुख ऋण आधारित अनुदान कार्यक्रम आहे, ज्याचा मूळ उद्देश, महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यासह देशभरात बिगरशेती क्षेत्रात सूक्ष्म उपक्रमांची स्थापना करून ग्रामीण आणि शहरी बेरोजगार व्यक्तींसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. बँका कर्ज प्रदान करतात तर भारत सरकार खादी आणि ग्रामोद्योग आयोगामार्फत अनुदान (ज्याला मार्जिन मनी सबसिडी देखील म्हणतात) प्रदान करते.
परभणी जिल्ह्यातील पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची गेल्या तीन वर्षातील कामगिरी पुढीलप्रमाणे आहे.
Year
|
Project
(in numbers)
|
Margin Money released
(Rs. in lakh)
|
Employment
(in numbers)
|
2019-20
|
87
|
119.95
|
696
|
2020-21
|
41
|
66.42
|
328
|
2021-22
|
73
|
88.18
|
584
|
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1843456)
Visitor Counter : 213