रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
महामार्गांवर होणारे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजना
Posted On:
21 JUL 2022 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2022
2019 आणि 2020 या कॅलेंडर वर्षांमध्ये देशातील रस्ते अपघातांमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपेक्षा राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राज्य महामार्गावरील (SH) रस्ते अपघातांमधील एकूण मृत्यूची टक्केवारी तक्त्यामध्ये दिली आहे :-
|
Category of Road
|
Road Length (in KM) (2019)
|
Road Fatalities
in 2019
|
Road Fatalities in 2020
|
|
All Roads in the
Country (NH, SH & other Roads)
|
6331757
|
151113
|
131714
|
|
National Highways (NH)
|
132499
|
53872
|
47984
|
|
% share of NH in total
|
2.1
|
35.7
|
36.4
|
|
State Highways (SH)
|
179535
|
38472
|
33148
|
|
% share of SH in total
|
2.8
|
25.5
|
25.2
|
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या माहितीची विश्लेषण केल्यानंतर असे निदर्शनास येते की अपघातांची कारणे ही मानवी चुका,रस्त्यांची स्थिती/पर्यावरण आणि वाहनांची स्थिती अशा विविध घटकांच्या परस्पर प्रभावावर अवलंबून असतात.
राष्ट्रीय महामार्गांसाठी रस्ते सुरक्षा परीक्षणाविषयीच्या विस्तृत मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून त्या अधिसूचित करण्यात आल्या आहेत. रस्ते सुरक्षा परीक्षण (ऑडिट) हे सर्व राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पांचा भाग असून ते अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम(EPC)/ बांधा, वापरा, हस्तांतरित करा (BOT) तत्वावर आधारलेले आहेत. मंत्रालयाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार किलोमीटर किंवा त्याहून अधिक लांबीच्या सर्व नवीन रस्ते प्रकल्पांमध्ये तपशीलवार प्रकल्प अहवाल सदर करतेवेळी किंवा त्याचा अभियांत्रिकी आराखडा तयार करतेवेळी रस्ते सुरक्षा परीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( NHAI), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ (NHIDCL) आणि राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) राष्ट्रीय महामार्ग (NH) शाखा या त्यांच्या अंमलबजावणी करणार्या संस्थांद्वारे रस्ते सुरक्षा पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पुढील पावले उचलली आहेत:-
- सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी (आराखडा , बांधकाम आणि कार्यान्वयन ) या सर्व टप्प्यात रस्ता सुरक्षा ऑडिट करणे;
- राष्ट्रीय महामार्गांवरील जंक्शन्सच्या ठिकाणी आवाज येतील अशा पट्ट्या म्हणजेच रंबल स्ट्रिप्स किंवा बार मार्किंगची तरतूद करणे ;
- राष्ट्रीय महामार्गांवर निश्चित ठिकाणी वेग मर्यादा दर्शवणाऱ्या चिन्हांची तरतूद करणे,
- बाजूच्या रस्त्यांवर गतिरोधक आणि संबंधित चिन्ह रेखांकित करणे
- IRC मध्ये दिलेल्या नियमानुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी अंबर रंगाच्या पट्ट्या बसविणे
- उंच तटबंदीवर आणि डोंगराळ प्रदेशात क्रॅश बॅरियर्स अर्थात तात्पुरत्या कुंपणाची स्थापना;
- रस्ते सुरक्षा ऑडिटमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांना प्रोत्साहन देणे, या अभ्यासक्रमासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर आघाडीच्या तांत्रिक शिक्षण किंवा संशोधन संस्थांसोबत सामंजस्य करार केले जातात:
- मंत्रालयाने ब्लॅकस्पॉट एमआयएस पोर्टल विकसित केले आहे जिथे सर्वाधिक अपघातप्रवण रस्ते म्हणजेच ब्लॅकस्पॉट्स, छायाचित्रे, आणिहे चित्र बदलण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न आणि त्यांनंतरचे अभिप्राय एकत्रित केले जातील आणि त्यांचे परीक्षण केले जाईल.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Thakur/B. Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1843455)
अभ्यागत कक्ष : 144