महिला आणि बालविकास मंत्रालय
देशातील महिलांच्या स्थितीत सुधारणा
Posted On:
20 JUL 2022 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2022
राष्ट्रीय कुटुंब, आरोग्य सर्वेक्षण -5 (NFHS- 5), राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग (NCRB), आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा (HMIS) इत्यादीं संस्थाकडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीवरून असे लक्षात येते की, अलीकडच्या काही वर्षांत देशातील महिला आणि मुलींच्या स्थितीत सुधारणा दिसून येत आहे.
हिंसाचार आणि संकटाचा सामना करणार्या महिलांना मदत करण्याऱ्या विविध योजना तसेच विविध कायदे आणि योजनाबद्ध रितीने केलेली मध्यस्थी, धोरणे आणि कार्यक्रमांद्वारे भारत सरकार महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देत आहे. यापैकी काही वन स्टॉप सेंटर (OSC), महिला हेल्पलाइन (WHL) आणि अनेक सामाजिक संरक्षण योजना आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY), आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY), प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण आणि शहरी), प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच वृद्ध, दिव्यांग आणि विधवांसाठीच्या विविध निवृत्ती वेतन योजना देखील यात समाविष्ट आहेत.
|
Parameters
|
NFHS-4
|
NFHS-5
|
|
Currently married women who usually participate in their household decisions (%)
|
84
|
88.7
|
|
Women owing a house and/ or land (alone or jointly with others) (%)
|
38.4
|
43.3
|
|
Women having a bank or savings account that they themselves use (%)
|
45.9
|
54.0
|
|
Ever-married women age 18-49 years who have ever experienced spousal violence
|
31.2
|
29.3
|
|
Ever-married women age 18-49 years who have experienced physical violence during any pregnancy (%)
|
3.9
|
3.1
|
|
Young women age 18-29 years who experienced sexual violence by age 18 (%)
|
1.5
|
1.5
|
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभांमध्ये इतर गोष्टींबरोबरच महिलांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा,घरातील वायू प्रदूषणात घट,जंगले आणि इतर नैसर्गिक संसाधनांवर कमी दबाव,श्रम नियोजन आणि वेळेची बचत यांचा समावेश होतो, यामुळे महिलांचे सक्षमीकरण होत आहे. स्वयंपाकासाठीचा गॅस जो पूर्वी फक्त देशातील 62% जनतेला उपलब्ध होता तो आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे संपृक्ततेपर्यंत आला आहे.
देशातील महिलांवर अशा प्रकारच्या सामाजिक संरक्षण योजनांचा प्रभाव हा बहुआयामी आहे. या प्रभावांमध्ये महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि महिलांच्या शिक्षण , स्वाभिमान, मनोबल, आत्मविश्वास आणि आंतरिक सामर्थ्य यामध्ये सुधारणा यांचा समावेश होतो. या सर्व उपाययोजनांमुळे महिलांवरील गुन्हे कमी झाले आहेत. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-4 च्या तुलनेत राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण -5 मधल्या अहवालामध्ये , महिलांच्या स्थितीत अनेक बाबींवर सुधारणा झाली आहे असे दिसून आले आहे.
ही माहिती केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तराद्वारे दिली.
S.Tupe/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1843098)
अभ्यागत कक्ष : 249