कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळसा आणि खाण क्षेत्रांचे राष्ट्र उभारणीत भरीव योगदान - केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी


कोळसा आणि खाण या क्षेत्रात व्यवस्थापन अभिमुखता निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या अशासकीय संचालकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्र्यांनी केले उद्‌घाटन

प्रविष्टि तिथि: 12 JUL 2022 4:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2022

 

 

पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला दृष्टीसमोर ठेवून देशाच्या उभारणीत आत्मनिर्भर होण्यासाठी कोळसा आणि खाण क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असे केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.

कोळसा आणि खाण मंत्रालयांतर्गत आज दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांमधील  (CPSE) अशासकीय संचालकांसाठी (NODs) आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच व्यवस्थापन अभिमुखता कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, की केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांच्या (CPSEs) कामगिरीत आणखी सुधारणा करण्यासाठी अशासकीय संचालक (NODs) महत्वाची भूमिका बजावू शकतात. कोळसा आणि खाण क्षेत्र हे सर्वात मोठे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहेत. ते पुढे म्हणाले, की सध्याचे सरकार राष्ट्र उभारणीत कोळसा आणि खाण क्षेत्राचा यथोचित वापर करण्याचा विचार करत आहे. उच्च उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही क्षेत्रे संक्रमण अवस्थेतून जात आहेत, असेही ते म्हणाले.

कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, कोळसा मंत्रालयाचे सचिव डॉ. अनिल कुमार जैन, कोळसा आणि खाण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध सहाय्यक संस्थांचे अशासकीय संचालक (NODs) या अभिमुखता कार्यक्रमाला उपस्थित होते.

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1840934) आगंतुक पटल : 253
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Kannada