भारतीय स्पर्धा आयोग
श्रेम InvIT यांच्याकडून दिलीप बिल्डकॉन लिमिटेड आणि त्यांच्या सहयोगींकडे असलेल्या दहा रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पातील भागभांडवलाच्या संपादनाला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजूरी
Posted On:
12 JUL 2022 11:26AM by PIB Mumbai
श्रेम इनव्हिटद्वारे (Shrem InvIT) दिलीप बिल्डकॉन लिमिटेड (डिबीएल) आणि त्यांच्या सहयोगींकडे असलेल्या दहा रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पातील (Target SPVs) भागभांडवलाच्या संपादनाला भारतीय स्पर्धा आयोगाने काल मंजूरी दिली. स्पर्धा कायदा, 2002 च्या कलम 31(1) अंतर्गत ही मान्यता दिली आहे.
प्रस्तावित संयोजनामध्ये लक्ष्य एसपीव्ही मधील 100% भागभांडवलाचे अधिग्रहण समाविष्ट आहे. यामध्ये श्रेम इनव्हिटच्या काही युनिट्सचा डीबीएल आणि त्याच्या सहयोगींना संपादनासाठी विचारात घेतलेला मुद्दा देखील समाविष्ट आहे.
श्रेम इनव्हिट (Shrem InvIT) हा भारतीय न्यास कायदा, 1882 अंतर्गत आणि सेबीकडे InvIT नियमावली 2014 अंतर्गत नोंदणीकृत न्यास आहे. पायाभूत सुविधा गुंतवणूक प्रक्रीया पुढे नेण्याच्या उद्देशाने त्याची स्थापना करण्यात आली आहे.
लक्ष्यित एसपीव्हीएस, कर्नाटक, झारखंड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात रस्ते प्रकल्प हाती घेत आहेत. विशिष्ट रस्ते प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने त्यांचा समावेश केला आहे.
डिबीएल, रस्ते आणि महामार्गांचे बांधकाम, संचालन आणि देखभाल या व्यवसायात कार्यरत आहे. डिबीएल एक ईपीसी कंत्राटदार म्हणून सरकारच्या स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे रस्ते प्रकल्प मिळवते.
***
S.Thakur/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840899)
Visitor Counter : 217