संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाकडून 13 ऑगस्ट 2022 रोजी मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या दरम्यान मुंबई हेरिटेज रनचे आयोजन होणार
वरुण रन (10 km) आणि समुद्र रन(5 km) साठी नोंदणी खुली
Posted On:
10 JUL 2022 3:18PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाकडून 13 ऑगस्ट 2022 रोजी दक्षिण मुंबई जिल्ह्यातील वारशाच्या भोवती 10 किमीच्या एका आगळ्या वेगळ्या दौडीचे आयोजन करण्यात येणार आहे. या शहराच्या चैतन्यमयी वारशाबाबत जागरुकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

भारतीय नौदलाच्या मुंबई हेरिटेज रनच्या उद्घाटनाची आवृत्ती म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे आणि भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल, वर्षभर आयोजित होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांचा एक भाग आहे.
या नियोजित मार्गावर सुंदर व्हिक्टोरियन गॉथिक शैली आणि कलात्मकतेचे दर्शन घडवणाऱ्या अनेक इमारती युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत आहेत.
या कार्यक्रमासाठी नोंदणी खुली झाली आहे आणि जलदगतीने जागा भरल्या जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत दोन अंतराच्या श्रेणी आहेत.
1. 10 किमीच्या वरुण रनमध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेल्या 32 स्थानांचा समावेश आहे.
2. 5 किमीच्या समुद्र रनमध्ये महत्त्वाच्या 19 स्थानांचा समावेश आहे.
या दोन्ही दौडींसाठी अनुक्रमे रु.1275/- आणि रु. 975/- शुल्क आहे.
केवळ मर्यादित जागा उपलब्ध आहेत- त्यामुळे ज्यांना यात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी खालील लिंकवर त्वरेने नोंदणी करावी.
https://youtoocanrun.com/races/indian-navy-mumbai-heritage-run-2022/?utm%20source=Refer&utm%20medium=Press%20Release&utm%20campaign=INMHR
मोबाईल ऍप आणि हेरिटेज वॉक
आणखी एक अनोखे वैशिष्ट्य म्हणून या शर्यतीत सहभागी होणाऱ्यांना या मार्गावरील महत्त्वाच्या 30 स्थानांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती देण्यासाठी कंपॅनियन मोबाईल ऍप विकसित करण्यात आले आहे. या मानाच्या 30 इमारतींवर त्यांची माहिती 13-15 ऑगस्ट 2022 दरम्यान मजकुराच्या स्वरुपात प्रदर्शित केली जाईल. या रनच्या पूर्वसंध्येला नियोजित मार्गावर एका आकर्षक हेरिटेज वॉकचे देखील आयोजन करण्यात येईल आणि हा उपक्रम सर्वसामान्य जनतेसाठी खुला असेल.
या शर्यतीचे व्यवस्थापन भागीदार असलेल्या ''यू टू कॅन रन'' कडून वेस्टर्न नेव्हल कमांडला मदत करण्यात येईल. अतिशय मनोहारी वास्तुरचना आणि दक्षिण मुंबईचा मानबिंदू असलेल्या या इमारतींकडे मुंबईकरांचे या रनच्या निमित्ताने लक्ष वेधले जाईल, अशी नौदलाला आशा आहे. मुंबईच्या वारशाचे हितधारक असलेल्या इतर संस्थांच्या सहकार्याने नौदलाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
***
Jaydevi PS/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840568)
Visitor Counter : 310