संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

‘संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता ’ या विषयावरील पहिल्या प्रदर्शनाचे नवी दिल्ली येथे 11 जुलै रोजी होणार आयोजन


नव्याने -विकसित 75 कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादनांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करणार प्रारंभ

Posted On: 08 JUL 2022 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2022

 

‘संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील पहिल्या प्रदर्शनाचे आणि परिसंवादाचे नवी दिल्ली येथे 11 जुलै 2022 रोजी आयोजन होणार असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या  संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये सेवा, संशोधन संस्था, उद्योग आणि स्टार्ट-अप आणि नवोन्मेषकारांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विकसित केलेले उपाय प्रदर्शित करण्यात येतील आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उत्पादनांचा प्रारंभ करून ती  उत्पादने बाजारात आणली जातील.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित उत्सवाचा एक भाग म्हणून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आणि संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भरता’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी, या  भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून  संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त असलेली नव्याने -विकसित कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 75 उत्पादने/तंत्रज्ञान यांचा प्रारंभ केला जाईल अशी माहिती, या कार्यक्रमाबाबतच्या  पत्रकार परिषदेत बोलताना  संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांनी दिली.  स्वयंचलन /मानवरहित रोबोटिक्स प्रणाली, सायबर सुरक्षा, मानवी वर्तन विश्लेषण,बुद्धिमत्ता निरीक्षण प्रणाली , लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी  व्यवस्थापन , भाषा /आवाज  विश्लेषण  आणि कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर आणि इंटेलिजन्स, पाळत ठेवणे आणि टेहळणी (सी4आयएसआर ) प्रणाली  आणि विश्लेषणात्मक माहिती या संबंधित उत्पादनांचा समावेश आहे. प्रारंभ करण्यात येणाऱ्या  75 उत्पादनांव्यतिरिक्त, आणखी 100 उत्पादने  विकासाच्या विविध टप्प्यात आहेत, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय, या कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रत्येकी दोन प्रमुख संरक्षण निर्यातदारांचा गौरव  केला जाईल. या कार्यक्रमात सेवा, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्या सक्रिय सहभागासह.‘संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’, ‘अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय’ आणि ‘संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता  – उद्योग दृष्टिकोन ’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय यावर  विद्यार्थ्यांकडून उज्ज्वल नाविन्यपूर्ण कल्पना प्राप्त करण्यासाठी ‘जेननेक्स्ट एआय’ उपाययोजना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता   तज्ञांनी तयार केलेल्या पहिल्या तीन कल्पनांचाही गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादनांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला परदेशातील मान्यवर, संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि भारत सरकारच्या इतर मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी, संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1840204) Visitor Counter : 121


Read this release in: Urdu , English , Hindi