सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या 2003 परिषदेच्या आंतर-सरकारी समितीवर भारताची निवड

Posted On: 07 JUL 2022 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जुलै 2022

अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या 2003 परिषदेच्या आंतरसरकारी समितीचा सदस्य म्हणून भारताची 2022-2026 या कालावधीसाठी निवड झाली आहे. पॅरिस येथे युनेस्कोच्या मुख्यालयात झालेल्या 2003 परिषदेच्या 9व्या आमसभेदरम्यान 5 ते 7 जुलै 2022 या कालावधीत आंतरसरकारी  समितीच्या निवडणुका झाल्या होत्या. केंद्रीय संस्कृती , पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी. के.  रेड्डी यांनी ही घोषणा केली.

आशिया-प्रशांत  गटात रिक्त झालेल्या चार जागांवर भारत, बांगलादेश, व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया आणि थायलंड या सहा देशांची  उमेदवारी होती. उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या 155 देशांकडून  भारताला 110 मते मिळाली.

2003 च्या ठरावानुसार आंतरसरकारी समितीमध्ये 24 सदस्य असतात आणि समान भौगोलिक प्रतिनिधित्व या तत्त्वांनुसार आणि क्रमानुसार परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निवडले जातात. समितीचे देशांमधील सदस्य चार वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात.

ठरावामधील उद्दिष्टांना चालना देणे, सर्वोत्तम पद्धतींवर मार्गदर्शन करणे आणि अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी उपाययोजनांवर शिफारशी करणे याचा आंतर सरकारी समितीच्या काही मुख्य कार्यांमध्ये समावेश आहे.  अमूर्त वारशाचा समावेश त्यांच्या यादीमध्ये करण्यासाठी   तसेच कार्यक्रम आणि प्रकल्पांच्या प्रस्तावांसाठी  देशांनी  सादर केलेल्या विनंत्यांचीही तपासणी ही समिती करते

R.Aghor /S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1839972) Visitor Counter : 323


Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati