कृषी मंत्रालय
सर्वात दुर्बल घटकांच्या जीवनात बदल घडवून आणणे हाच खरा विकास - तोमर
भारताकडे शेतकऱ्यांच्या रूपाने प्रचंड कुशल मनुष्यबळ आहे - कृषिमंत्री
प्रविष्टि तिथि:
24 JUN 2022 10:12PM by PIB Mumbai
विकासाचा विचार करताना आपला सर्वांगीण दृष्टिकोन असायला हवा असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. “विकासाचा अर्थ केवळ रस्ते किंवा घरे बांधणे असा होत नाही, तर समाजातील सर्वात दुर्बल घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला पाहिजे, तरच खरा विकास होईल.

इंडिया सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्हमध्ये तोमर बोलत होते. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी हे विशेष अतिथी होते. तोमर म्हणाले की, आपल्या देशाची मोठी लोकसंख्या आहे, त्यामुळे सर्व लोकांना संधी उपलब्ध करून दिल्या आणि त्यांनी एकत्रितपणे योगदान दिले तरच विकसित भारत शक्य होईल.

तोमर म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतीची भूमिका महत्त्वाची आहे. तोमर म्हणाले की, आज कृषी क्षेत्रात ड्रोन, डिजिटल अॅग्री मिशन आणि खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन त्याचे उन्नतीकरण केले जात आहे. कृषी स्टार्टअप्सला प्रोत्साहन,किसान क्रेडिट कार्डचे वितरण आणि 16 लाख कोटी रुपये अल्पावधी कर्ज यासारखी अनेक ठोस पावले उचलण्यात आली आहेत. “कोविड-19 महामारीच्या काळातही, शेतकर्यांनी अन्नसुरक्षा सुनिश्चित केली.त्याच बरोबर केंद्राने 80 कोटी गरीब लोकांना मोफत अन्नधान्य देखील दिले,” असे तोमर म्हणाले.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1836851)
आगंतुक पटल : 234