संरक्षण मंत्रालय

नव्याने मंजूरी मिळालेल्या 10 सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ई-कौन्सिलिंगच्या दुसऱ्या फेरीसाठी वेब पोर्टल पुन्हा सुरु

Posted On: 22 JUN 2022 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जून 2022

 

सैनिक स्कूल सोसायटीच्या नव्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेशाची पहिली फेरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, आता दुसऱ्या फेरीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी, ई-कौन्सिलिंग ( ई-समुपदेशन) वेब पोर्टल आजपासून पुन्हा सुरु झाले आहे.  दुसऱ्या फेरीत नव्या मान्यताप्राप्त 10 सैनिकी शाळांमध्ये 534 पदे भरली जाणार आहेत.

सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठीची मार्गदर्शन/समुपदेशन प्रक्रिया https://sainikschool.ncog.gov.in/ecounselling  या पोर्टलवर 26 जून 2022 पर्यन्त उपलब्ध असेल.  राष्ट्रीय चाचणी संस्था- एनटीए ने घेतलेल्या अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत (AISSEE-2022) उत्तीर्ण झालेले सर्व पात्र विद्यार्थी, ज्यांनी पहिल्या फेरीच्या ई-कौन्सिलिंग साठी नोंदणी केली होती, ते दुसऱ्या फेरीसाठी पात्र असतील. मात्र याला खालील अपवाद आहेत, ते खालीलप्रमाणे :

  • ज्या विद्यार्थ्यांना याधीच सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला आहे (सध्याच्या किंवा नव्याने सुरु होणाऱ्या)
  • ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत, त्यांनी दिलेल्या प्राधान्य/पसंतीक्रमाच्या बाहेरच्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे, मात्र त्यांनी त्याला अजिबात प्रतिसाद दिलेला नाही.
  • ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला असूनही, त्यांनी त्यासाठी उत्सुकता दर्शवलेली नाही.
  • पहिल्या फेरीत ज्यांना त्यांच्या पसंतीच्या शाळेत प्रवेश मिळाला असून, त्यांनी तिथे जाण्याची इच्छाही दर्शवली आहे. मात्र अद्याप प्रवेश शुल्क भरलेले नाही.

असे, सगळे वगळता इतरांना दुसऱ्या फेरीच्या ई-समुपदेशनात प्रवेश घेता येईल. दुसऱ्या फेरीत प्रत्येक पात्र विद्यार्थी त्याच्या पसंतीच्या तीन शाळा सांगू शकतो/शकते. प्रत्यक्ष पडताळणी आणि प्रवेश शुल्क भरण्याची तारीख, लवकरच पोर्टलवर अपलोड केली जाईल. सविस्तर माहितीसाठी, पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश पोर्टलला भेट द्यावी.

 

 

S.Kulkarni/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 



(Release ID: 1836283) Visitor Counter : 229


Read this release in: Hindi , English , Urdu , Tamil