रसायन आणि खते मंत्रालय
पुण्यातील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडला संसदीय कामकाज समितीची भेट
Posted On:
15 JUN 2022 7:04PM by PIB Mumbai
पुणे, 15 जून 2022
रसायने आणि खते विषयक संसदीय कामकाज समितीने दि. 13 व 14 जून 2022 रोजी पुण्यातील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडला भेट दिली. समितीच्या अध्यक्षा कणीमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वातील या समितीच्या सदस्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या पुढील सदस्यांचा समावेश होता- दीपक बैज, प्रतापराव पाटील चिखलीकर, कृपानाथ मल्लाह, प्रभुभाई वसावा, सत्यदेव पचौरी, अरुणकुमार सागर, अयोध्या रामी रेड्डी अल्ला, जयप्रकाश निषाद आणि विजयपालसिंग तोमर. त्याबरोबरच, औषध विभागाचे आर्थिक सल्लागार एच.के.हजोंग आणि लोकसभा सचिवालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारीही या दौऱ्यावर आले होते.
या संसदीय समितीने पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडच्या कारखान्याला भेट दिली आणि तेथे उपलब्ध उत्पादन सुविधांची व उत्पादनांची प्रत्यक्ष पाहणी केली. कंपनीच्या भविष्यकालीन नियोजनाची माहितीही यावेळी त्यांना देण्यात आली. या स्थायी समितीच्या सदस्यांसमोर एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्यात आले. कंपनीच्या अडचणींवर सकारात्मक रीतीने विचार करण्याचे आणि तिच्या पुनरुज्जीवनासाठी उपायांची शिफारस करण्याचे आश्वासन या समितीच्या सदस्यांनी कंपनीला दिले.



S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834342)
Visitor Counter : 145