भारतीय स्पर्धा आयोग
एअर एशिया इंडियामधील समभागांचा पूर्ण हिस्सा एअर इंडियाने घेण्यास भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी
Posted On:
14 JUN 2022 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2022
एअर एशिया इंडियामधील समभागांचा पूर्ण हिस्सा एअर इंडियाने घेण्यास CCI अर्थात भारतीय स्पर्धा आयोगाने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावित वाटणीमध्ये असे सांगितले आहे की, एअर एशिया (इंडिया) प्रा.लि. (एअर एशिया इंडिया मधील) भागभांडवलाच्या समभागांच्या संपूर्ण हिस्सा एअर इंडिया लिमिटेडने (AIL) घ्यावा. सध्या एअर एशिया इंडियामध्ये TSPL चे 83.67% समभाग असून त्यामुळे ती अप्रत्यक्षपणे TSPL (टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड) च्या पूर्णपणे मालकीची उपकंपनी आहे.
एअर इंडिया लिमिटेड आणि त्याची उपकंपनी एअर इंडिया एक्स्प्रेस लिमिटेड मिळून प्रामुख्याने पुढील व्यवसाय करतात:
- देशान्तर्गत शेड्यूल्ड प्रवासी हवाई वाहतूक सेवा,
- आंतरराष्ट्रीय शेड्यूल्ड प्रवासी हवाई वाहतूक सेवा,
- भारतात हवाईमार्गे कार्गो वाहतूकसेवा,
- भारतात चार्टर विमानसेवा.
एअर एशिया इंडिया ही TSPL आणि एअर इंडिया इन्व्हेस्टमेंट लि.(AAIL) यांची संयुक्त व्यवसाय कंपनी असून त्यात TSPL चे 83.67% समभाग तर AAIL चे 16.33% समभाग आहेत. एअर एशिया ह्या ब्रँड नावाने एअर एशिया इंडियाचे काम चालते. ही कंपनी पुढील व्यवसाय करते:
- देशान्तर्गत शेड्यूल्ड प्रवासी हवाई वाहतूक सेवा,
- हवाईमार्गे कार्गो वाहतूकसेवा,
- भारतात चार्टर विमानसेवा.
एअर एशिया इंडिया आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवर शेड्यूल्ड प्रवासी वाहतूक सेवा देत नाही.
* * *
R.Aghor/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834011)
Visitor Counter : 179