वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जागतिक व्यापार संघटनेमध्ये विकसनशील आणि अविकसित देशांचे हित जपण्यासाठी भारताने मांडली जोरदार भूमिका


'' विकसनशील देशांच्या हिताच्या विरोधातील व्यवस्थेची दिशा बदलून जागतिक व्यापार संघटनेच्या सुधारणांचे सध्याचे प्रस्ताव संघटनेच्या संस्थात्मक रचनेत मूलभूत बदल घडवू शकतात'' : पियूष गोयल

अन्न सुरक्षा असो वा आरोग्य, आर्थिक कल्याण असो किंवा मुक्त पुरवठा साखळी , कोणत्याही संकटाला तात्काळ प्रतिसाद देण्यास जग असमर्थ असल्याचे कोविड महामारीने दाखवून दिले आहे -गोयल

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी “प्रो प्लॅनेट पीपल” च्या 3 पी वर आधारित पर्यावरणाप्रति जागरूक , अधिक शाश्वत जीवनशैली स्वीकारण्याचा प्रस्ताव गोयल यांनी मांडला

Posted On: 13 JUN 2022 9:53PM by PIB Mumbai

जागतिक व्यापार  संघटनेमध्ये  विकसनशील आणि अविकसित  देशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारताने आपली  भूमिका भक्कमपणे मांडली. सोप्या भाषेत सांगायचे तर ,केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री,   पीयूष गोयल, जिनिव्हा येथे जागतिक व्यापार संघटनेच्या  12 व्या मंत्रिस्तरीय  परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत,  त्यांनी जागतिक व्यापार संघटनेतील सुधारणांच्या “विषम ” प्रस्तावाबद्दल चिंता व्यक्त करत कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि अन्नधान्याच्या सार्वजनिक साठयाबाबत असलेली  जागतिक असमानता दूर करत विकसनशील देशांसाठी विशेष आणि असमान  वागणूक तरतुदी अत्यावश्यक असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली

 

 .काल ‘मंत्रिस्तरीय परिषदेसमोरील आव्हाने’ या विषयावर बोलताना ,गोयल म्हणाले की,  जागतिक व्यापार संघटनेच्या  सुधारणेसाठी सध्याचे प्रस्ताव विकसनशील देशांच्या हिताच्या विरोधातील विषम  व्यवस्थेला झुगारून संघटनेच्या संस्थात्मक रचनेत मूलभूत बदल घडवू  शकतात. ''जनता आणि विकास याला जागतिक व्यापार संघटनेच्या भविष्यातील कार्यक्रमाच्या   केंद्रस्थानी ठेवून  आपल्याला  सर्वसहमतीने मूलभूत तत्त्वे जपून आणि विकसनशील जगासाठी विशेष आणि विभेदक वागणूक सुनिश्चित करून पुढे जाण्याची गरज आहे.

 

अन्नसुरक्षा असो की आरोग्य, आर्थिक कल्याण असो किंवा मुक्त  पुरवठा साखळी , कोणत्याही संकटाला तत्काळ प्रतिसाद देण्यास जग असमर्थ असल्याचे कोविड महामारीने दाखवून दिले आहे  असे गोयल म्हणाले.

 

“जेव्हा जग आतुरतेने दिलासा मिळण्याच्या शोधात होते, तेव्हा जागतिक व्यापार संघटनेची  गरज भासली.उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर ,कोविडनंतर दोन वर्षांनंतरही लस विषमता  कायम आहे.जेव्हा अविकसित आणि अनेक विकसनशील देशांतील लोकांचे  लसीकरण  अद्याप पूर्ण झाले नसताना ,  असे काही देश आहेत ज्यांनी आधीच लसीच्या तिसऱ्या  आणि चौथ्या मात्राही दिल्य आहेत ' ,असे  त्यांनी सांगितले. हे जागतिक प्रशासनाचे सामूहिक अपयश आहे आणि आपण आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे, जे जबाबदार आहेत त्यांनी त्यांच्या अंतःकरणापासून  खोलवर विचार करणे आवश्यक आहे, हे आपल्याला  जगातील प्रत्येक नागरिकासाठी अधिक न्याय्य, निष्पक्ष आणि समृद्ध भविष्य घडवण्यास सहाय्य  करेल आणि शेवटी आपण सर्वांनी एकत्रितपणे मान्य केलेली शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यास  मदत होईल.” असे ते म्हणाले.

“सध्याचे जागतिक अन्न संकट आपल्याला आता प्रत्यक्ष कृतीचे  स्मरण करून देणारे आहे .  गरीब आणि असुरक्षित लोकांसाठी राखून ठेवलेल्या अन्नसाठ्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांचे जीवन आपण धोक्यात घालू शकतो का?", असा प्रश्न गोयल यांनी विचारला.

“कोणीही उपाशी झोपणार नाही हे सुनिश्चित करत  महामारीच्या  काळात,  एकट्या भारताने 80 लाख भारतीयांना 100 लाख  टन अन्नधान्याचे मोफत वाटप केले,  ज्याचे मूल्य सुमारे  50 अब्ज अमेरिकी डॉलर्स  आहे.हे आमच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वितरित केलेल्या अन्नधान्यापेक्षा जास्त होते, असे त्यांनी सांगितले.

मत्स्यव्यवसाय अनुदानाबाबत वाटाघाटी करताना पारंपरिक मच्छीमारांच्या जीवनमानाशी तडजोड करता येणार नाही, असे मत गोयल यांनी यावेळी मांडले.

 

“आपण  काही देशांच्या विशेषाधिकारांचे संस्थात्मकीकरण करू शकत नाही आणि समाजातील असुरक्षित उपेक्षित घटकांसाठी काम करणार्‍यांचा प्रगतीचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही.जे हानिकारक खोल समुद्रात मासेमारी करत नाहीत, विशेषतः  त्या देशांसाठी आपल्याला वेगळा दृष्टिकोन ठेवणे   आवश्यक आहे.हवामानाच्या मुद्द्यांसंदर्भात, आपल्याला “प्रो प्लॅनेट पीपल” च्या 3 पी वर आधारित, पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक ,  अधिक शाश्वत जीवनशैली अंगीकारण्याची गरज आहे, असा प्रस्ताव  गोयल यांनी मांडला.

***

SK/VG/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833708) Visitor Counter : 266


Read this release in: English , Urdu , Hindi