कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुरु असलेल्या आयकॉनिक वीकचा भाग म्हणून, आयआयसीएच्या “ईएसजी-सीएसजी मधील सर्वोत्तम पद्धतींविषयीच्या प्रदर्शनाचे’ राव इंद्रजित सिंह यांच्या हस्ते  उद्या उद्घाटन

Posted On: 11 JUN 2022 6:42PM by PIB Mumbai

 

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय सध्या आयकॉनिक वीक साजरा करत आहे. याचाच भाग म्हणून, भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्था आयआयसीए तर्फे, स्वतंत्र भारताचा इतिहास, इथल्या नागरिकांचा देदीप्यमान इतिहास, त्यांची विविधांगी संस्कृती ह्या सगळ्याची महती सांगणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्री राव इंद्रजित सिंह ह्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील, तर, विभागाचे सचिव राजेश वर्मा ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून, आयआयसीए ईएसजी-सीएसजी मधील सर्वोत्तम पद्धतींचे प्रदर्शनआयोजित केले आहे. नीती आयोग, सार्वजनिक आस्थापना आणि युनिसेफच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवले जाणार असून, यात उत्तम/प्रभावी सीएसआर असलेल्या देशभरातील नामवंत संस्था सहभागी होणार असून त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धती ते प्रदर्शनात सांगतील. ह्या प्रदर्शनातून, ईएसजी/सीएसआर मधील हितसंबंधीयांना ह्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी आणि पद्धतींचे आदानप्रदान करण्याची संधी मिळेल. यातील वैशिष्ट्यपूर्ण केस स्टडीज नंतर पुस्तकातून/संकलनातून प्रकाशित केले जाईल.

आयआयसीए ने खालील विषयांवर तीन चर्चासत्रे देखील आयोजित केली आहेत :

  • ईएसजी अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावी सीएसआर
  • वित्तीय समावेशन आणि महिलांसाठीची साक्षरता
  • कॉर्पोरेट प्रशासन: भारतासाठी उन्नत दूरदृष्टी

ह्या चर्चासत्रात  उद्योग/ कॉर्पोरेट क्षेत्र तसेच शिक्षणक्षेत्रातील नामवंत वक्ते  सहभागी होतील.

सविस्तर कार्यक्रम बघण्यासाठी इथे क्लिक  करा: PROGRAMME.

 

आयआयसीए बद्दल

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (IICA) ची स्थापना, भारतीय व्यावसायिक वातावरणात संशोधन, क्षमताबांधणी आणि प्रोत्साहन अशा प्रयत्नांद्वारे वैचारिक नेतृत्वाला पुढे नेण्यासाठी एक थिंक टँकम्हणून करण्यात आली आहे. ही संस्था, कॉर्पोरेट व्यवहारांशी संबंधित सर्व प्रश्न, त्यांचे प्रशासन, नियामक, धोरण, संरचनात्मक मुद्दे यावर परिणाम होतो, अशा सर्व समस्यांसाठी एक समग्र धोरणात्मक दृष्टीकोन प्रदान करते.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1833178) Visitor Counter : 283


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil