संरक्षण मंत्रालय
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील ताबा रेषेजवळील भागांच्या सुरक्षा स्थितीचा लष्करप्रमुखांनी घेतला आढावा
Posted On:
10 JUN 2022 8:00PM by PIB Mumbai
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे सध्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमधील ताबा रेषेजवळील भागांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांनी भारतीय लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, या क्षेत्राला दिलेली ही पहिलीच भेट आहे. उत्तर भारत क्षेत्राचे आर्मी कमांडर, सेंट्रल कमांड आणि जनरल ऑफीसर कमांडिंग यावेळी लष्करप्रमुखांसोबत होते.
सीमेवरील चौक्यांच्या दौऱ्यादरम्यान लष्करप्रमुखांना स्थानिक कमांडर्सकडून सीमेवरील सद्य परिस्थितीबद्दल माहिती दिली जात आहे. सीमावर्ती क्षेत्रातील कार्यान्वयन सज्जतेचे प्रत्यक्ष मूल्यांकन करत, लष्करप्रमुख पर्वतारोहण कौशल्ये आणि लांब पल्ल्याची गस्त यासह, तैनात तुकड्यांच्या अती उंचीवरील कार्यान्वयन क्षमतेची पाहणी करणार आहेत. लष्करप्रमुख सध्या सुरु असलेल्या असलेल्या पायाभूत सुविधा आणि विकास कामांचा आणि त्यानंतर सीमावर्ती भागातील लष्कर-नागरिक संबंधांचाही आढावा घेत आहेत.
आपल्या दौऱ्यात कमांडर्सशी संवाद साधताना लष्करप्रमुखांनी सीमेवर दक्षता आणि सतर्कतेच्या गरजेवर भर दिला. बचावात्मक पवित्रा आणि तैनात तुकड्यांच्या कार्यान्वयन सज्जतेत जलद सुधारणा झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. देखरेखीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
लष्कर प्रमुखांनी सीमेवरील चौक्यांवर तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधत , त्यांच्या उच्च मनोबलाची प्रशंसा केली आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचे उच्च दर्जाचे मापदंड राखण्याचे आवाहन त्यांना केले. सीमावर्ती भागात कार्यान्वयन परिणामकारकता आणि शाश्वत विकासासाठी लष्कर, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, नागरी प्रशासन आणि पोलिस यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचीही त्यांनी प्रशंसा केली.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833008)
Visitor Counter : 207