विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
हवेची गुणवत्ता आणि हवामान बदल यावर संयुक्त संशोधनासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायर्नमेंटल स्टडीज, जपान आणि आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (ARIES), भारत यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला (MoU) मंत्रिमंडळाची मान्यता
Posted On:
08 JUN 2022 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2022
हवेची गुणवत्ता आणि हवामान बदल यावर संयुक्त संशोधन (यापुढे "संयुक्त संशोधन" असा उल्लेख) करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायर्नमेंटल स्टडीज, जपान आणि आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (एआरआयईएस), भारत यांच्यात सहयोगात्मक मार्गदर्शक तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला देण्यात आली. तसेच, भूतकाळात इतर कोणत्याही परदेशी संस्थांसोबत संशोधनाच्या तत्सम क्षेत्रांमध्ये एआरआयईएस, नैनितालने असे कोणतेही सामंजस्य करार केले नव्हते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
या कराराअंतर्गत खालील काही संभाव्य उपक्रम हाती घेतले जातील: -
- वैज्ञानिक उपकरणांचा संयुक्त वापर आणि परिचालन
- निरीक्षण पद्धतींवर वैज्ञानिक आणि तांत्रिक माहितीची देवाणघेवाण
- निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे संयुक्त विश्लेषण आणि वैज्ञानिक अहवाल तयार करणे
- संयुक्त शैक्षणिक आणि संशोधन उपक्रम.
- संशोधन करण्याच्या उद्देशाने पीएचडी विद्यार्थ्यांसह भेट देणार्या विद्यार्थ्यांची देवाणघेवाण.
- संयुक्त वैज्ञानिक कार्यशाळा आणि/किंवा चर्चासत्र
- एआरआयईएस बद्दल:
आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (एआरआयईएस ) ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत स्थापन झालेली स्वायत्त संशोधन संस्था आहे. एआरआयईएस हे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र आणि वातावरणीय विज्ञानातील संशोधनासाठी उत्कृष्टतेचे केंद्र आहे.
एनआयईएस बद्दल :
आंतरविद्याशाखीय आणि सर्वसमावेशक पद्धतीने पर्यावरणीय संशोधनाची विस्तृत परीघ असलेली नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हार्नमेंटल स्टडीज ( एनआयईएस) ही जपानमधील एकमेव संशोधन संस्था आहे. एनआयईएस पर्यावरण संरक्षणासंदर्भातील वैज्ञानिक निष्कर्ष काढण्यासाठी कार्य करते. मूलभूत संशोधन, माहिती संकलन आणि विश्लेषण, संरक्षण आणि पर्यावरणीय नमुन्यांचे जतन आणि तरतूद याद्वारे संस्थेचा संशोधन पाया मजबूत करणे यांसारख्या संशोधन प्रकल्पांवर एनआयईएस काम करत आहे.
* * *
R.Aghor/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832313)
Visitor Counter : 154