संरक्षण मंत्रालय
डीआरडीओच्या तंत्रज्ञान विकास निधी अंतर्गत निधी वाटपात प्रतिप्रकल्प 10 कोटी वरून 50 कोटी रूपयांची वाढ
प्रविष्टि तिथि:
08 JUN 2022 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2022
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रालयाच्या तंत्रज्ञान विकास निधी योजनेंतर्गत प्रति प्रकल्प निधी 10 कोटी रूपयांवरून 50 कोटी रूपये करण्यास मंजुरी दिली आहे. टीडीएफ योजना संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआऱडीओ) कार्यान्वित केलेली असून एंमएसएमईज आणि स्टार्ट अप्सने तयार केलेल्या संपूर्णपणे देशी बनावटीचे घटक, उत्पादने, प्रणाली आणि तंत्रज्ञान यांना पाठबळ देते.
संरक्षण खात्यातील संशोधन आणि विकासासाठीची 25 टक्के अर्थसंकल्पीय तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात खासगी उद्योगांसाठी तसेच स्टार्ट अप्स आणि शैक्षणिक संस्थांसाठी राखून ठेवली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थसंकल्पातील घोषणेच्या अनुषंगानेच निधीवाटपात वाढ केली असून संरक्षणात आत्मनिर्भर या दृष्टीकोनाला ती आणखी चालना देईल.
भारताला स्वयंपूर्ण करण्याच्या मार्गावर ठेवण्यासाठी टीडीएफ योजना संरक्षण उत्पादन क्षेत्रात उद्योगांना संरक्षण तंत्रज्ञानात नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकासासाठी जोरदार चालना देण्याच्या उद्देशाने तयार केली आहे. ही योजना प्रकल्पखर्चाचा एकूण 90 टक्के भार उचलते आणि उद्योगांना दुसरे उद्योग किंवा शैक्षणिक संस्थांसोबत काम करण्याची संधी देते. वाढीव निधीमुळे, उद्योग आणि स्टार्ट अप्स सध्याच्या अस्तित्वात असलेल्या आणि भविष्यातील शस्त्र प्रणाली आणि व्यासपीठांसाठी अधिक गुंतागुंतीचे तंत्रज्ञान आणि विकसित करण्यास सक्षम होतील. आजपर्यंत, टीडीएफ योजनेंतर्गत 56 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
* * *
S.Patil/U.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1832089)
आगंतुक पटल : 250