माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त क्षेत्रीय प्रचार कार्यालयाकडून 1 गोवा एनसीसी बटालियनच्या सहाय्याने स्वच्छता मोहिमेचे आयोजन

Posted On: 05 JUN 2022 1:53PM by PIB Mumbai

पणजी, 5 जून 2022

 

क्षेत्रीय प्रचार कार्यालय, गोवा यांनी आज 1 गोवा एनसीसी बटालियन आणि सम्राट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मीरामार समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत 150 एनसीसी कॅडेटस आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते. याप्रसंगी कॅडेटसनी आकर्षक फलकांच्या माध्यमातून शाश्वत पर्यावरणाचा संदेश दिला. 1 गोवा एनसीसी बटालियनचे कर्नल एम के एस राठोड, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांची याप्रसंगी उपस्थिती होती. 

कमांडिंग ऑफिसर कर्नल एमकेएस राठोड यांनी कचरानिर्मुलनासाठी कमीत कमी कचरा करण्याचा संदेश दिला.   

कमांडिंग ऑफिसर कर्नल एमकेएस राठोड यांनी कचरानिर्मुलनासाठी कमीत कमी कचरा करण्याचा संदेश दिला.   

पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी कचरा संकलन आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी नागरिकांना विशेषतः पर्यटकांना उघड्यावर कचरा फेकू नये, असे आवाहन केले. पालिकेने जागोजागी कचरापेट्या उभारल्या आहेत, त्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असे ते म्हणाले. महानगरपालिका बाजारपेठेतील विक्रेत्यांना कापडी पिशव्या पुरवत आहे. नागरिकांनी जुनी अथवा न वापरलेले कपडे फेकून देण्याऐवजी महानगरपालिकेकडे जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

क्षेत्रीय प्रचार अधिकारी रियाज बाबू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच क्षेत्रीय प्रचार कार्यालयाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

“केवळ एकच वसुंधरा” हे जागतिक पर्यावरण दिन 2022 चे मोहिमेचे घोषवाक्य आहे. या माध्यमातून ‘पर्यावरणपूरक पद्धतीने शाश्वतपणे जगणे” यावर भर देण्यात आला आहे.

***

S.Thakur/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1831283) Visitor Counter : 185


Read this release in: English