राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्यावतीने 7 आणि 8 जून रोजी राष्ट्रपती भवन येथे पदसिद्ध अभ्यागत या नात्याने केंद्रीय संस्थाच्या परिषद 2022 चे आयोजन
Posted On:
04 JUN 2022 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2022
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद केंद्रीय उच्च शिक्षण संस्थाचे अभ्यागत आहेत या नात्याने त्यांच्यावतीने 7 आणि 8 जून 2022 रोजी राष्ट्रपती भवनात ‘अभ्यागत परिषद 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते दि.7 जून 2022 रोजी संशोधन आणि तंत्रज्ञान विकास या श्रेणींमध्ये ‘2020 अभ्यागत पुरस्कार प्रदान’ केले जाणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, धर्मेंद्र प्रधान आणि इतर मान्यवर उपस्थिती राहणार आहेत.
अभ्यागत पुरस्कार प्रदान केल्यानंतर, परिषदेत विद्यापीठ अनुदान आयोग ‘यूजीसी’ चे अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार यांचे 'आझादी का अमृत महोत्सवा’मध्ये उच्च शिक्षण संस्थांची भूमिका आणि जबाबदाऱ्या' या विषयावर सादरीकरण होणार आहे.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 जून, 2022 रोजी, विविध विषयांवर सादरीकरणे आणि चर्चा होणार आहे. यामध्ये उच्च शिक्षण संस्थांची आंतरराष्ट्रीय क्रमवारी; शैक्षणिक-उद्योग आणि धोरण-निर्माते यांच्यातील सहयोग; शाळा, उच्च आणि व्यावसायिक शिक्षण एकत्रित करणे; उदयोन्मुख आणि विघटनकारी तंत्रज्ञानामध्ये शिक्षण आणि संशोधन अशा विषयांचा समावेश आहे.
राष्ट्रपती 161 केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांचे (सीआयएचई) पदसिद्ध अभ्यागत आहेत. या परिषदेमध्ये 53 केंद्रीय उच्च शिक्षण संस्थाचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत, तर इतर संस्था दूरदृश्य प्रणालीव्दारे, आभासी पद्धतीने जोडल्या जाणार आहेत. याशिवाय 161 उच्च शिक्षण संस्थांचे प्रमुख, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, शिक्षण मंत्रालयाचे सचिव (उच्च शिक्षण), विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष, आणि ‘एआयसीटीई’ चे अध्यक्ष देखील परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831210)
Visitor Counter : 174