आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकत्रित कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती 193.96 कोटीहून अधिक झाली आहे


12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना 3.43 कोटी हून अधिक पहिल्या डोसच्या मात्रा दिल्या गेल्या

भारतातील उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 22,416

गेल्या 24 तासांत, 3,962 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे

कोविड-19 मधून बरे होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.73 टक्के

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.77 टक्के

Posted On: 04 JUN 2022 10:31AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2022

आज सकाळी सात वाजता आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतात कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती 193.96 कोटीहून अधिक (1,93,96,47,071) पर्यंत पोहचली आहे. 2,47,05,065 सत्रांच्या माध्यमातून हे यश साध्य करण्यात आले आहे.

12  ते 14  वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च  2022 पासून कोविड-19 विरोधी लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत, 3.43 कोटी( 3,43,23,522) हून अधिक पौगंडावस्थेतील मुलामुलींना कोविड-19 विरोधी लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18 ते  59 वयोगटातील लोकांना  कोविड-19 खबरदारीचा डोस देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

तात्पुरत्या अहवालानुसार आलेला एकत्रित आकडेवारी खालीलप्रमाणे आहे :-

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,07,223

2nd Dose

1,00,42,723

Precaution Dose

52,83,019

FLWs

1st Dose

1,84,19,662

2nd Dose

1,75,88,656

Precaution Dose

88,80,226

Age Group 12-14 years

1st Dose

3,43,23,522

2nd Dose

1,74,07,846

Age Group 15-18 years

1st Dose

5,95,77,787

2nd Dose

4,61,14,291

Age Group 18-44 years

1st Dose

55,72,93,922

2nd Dose

49,14,16,143

Precaution Dose

10,20,313

Age Group 45-59 years

1st Dose

20,32,75,360

2nd Dose

19,11,58,688

Precaution Dose

15,00,725

Over 60 years

1st Dose

12,71,09,501

2nd Dose

11,92,44,984

Precaution Dose

1,95,82,480

Precaution Dose

3,62,66,763

Total

1,93,96,47,071

भारतात सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 22,416 इतकी असून अशा रूग्णांची संख्या देशातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या 0.05 टक्के इतकी आहे.

परिणामी, भारताचा कोविडमधून रूग्ण  बरे होण्याचा दर 98.73 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत,  2,697 रूग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रूग्णांची एकत्रित संख्या (कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून) सध्या 4,26,25,454 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत,  3,962 नवीन रूग्णांची नोंद देशभरात झाली आहे.

गेल्या 24 तासांत,  एकूण 4,45,814 इतक्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत 85.22 कोटी (85,22,09,788) इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 0.77 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.89 टक्के असल्याची नोंद झाली आहे.

 

 

Jaydevi PS/U.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 1831050) Visitor Counter : 229