केंद्रीय लोकसेवा आयोग

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 2021 चा (II)अंतिम निकाल जाहीर

Posted On: 03 JUN 2022 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2022

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2021 मध्ये घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 2021 च्या आधारावर आणि भारतीय संरक्षण अकादमी, डेहराडून, भारतीय नौदल अकादमीस एझिमला, केरळ तसेच वायुदल अकादमी, हैदराबाद (उड्डाणपूर्व) प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजे क्रमांक साठी 212 संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींमधील  गुणवत्तेवर आधारित पात्र ठरलेल्या 142 (81+47+14) उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे. सरकारने सूचित केल्याप्रमाणे भारतीय लष्करी अकादमीसाठी 100 जागा असून त्यात एनसीसी सी प्रमाणपत्र धारण करणााऱ्यया  (लष्कर शाखा) 13 आरक्षित जागांचा तसेच भारतीय नौदल अकादमी, एझीमला, केरळ कार्यकारी शाखेसाठी 22 पदे(साधारण सेवा/हायड्रो (ज्यात एनसीसी सी प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नौदल शाखा एनसीसी विशेष प्रवेशाच्या माध्यमातून आलेल्यांसाठी 3 जागा राखीव) आणि हवाई दल अकादमी, हैदराबादसाठी 32 जागा (एनसीसी सी प्रमाणपत्र धारण करणार्यांसाठी 3 जागा एनसीसी विशेष प्रवेशाच्या माध्यमातून आलेल्यांसाठी राखीव ) (वायुदल शाखा) आहेत.लेखी परीक्षेत भारतीय लष्करी अकादमी, भारतीय नौदल अकादमी आणि भारतीय वायुदल अकादमीसाठी अनुक्रमे 2469, 1079 आणि 599 उमेदवारांची पात्र ठरल्याची शिफारस आयोगाने केली आहे.

लष्करी मुख्यालयात सेवा निवड मंडळाकडून परीक्षेत उत्तीर्ण ठरणारे उमेदवार हे अंतिम पात्र उमेदवार आहेत. हे निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाचे संकेतस्थळ http://www.upsc.gov.in यावरही उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी, उमेदवार आयोगाच्या कार्यालयातील गेट सीच्या सुविधा काऊंटरवर वैयक्तिक येऊन किंवा 011- 23385271/ 011-23381125/ 011-23098543 दूरध्वनी क्रमांकावर कोणत्याही कार्यालयीन दिवशी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत संपर्क करू शकतात.

 

 

 

 

 

G.Chippalkatti/U.Kulkarni/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830951) Visitor Counter : 134


Read this release in: English , Urdu , Hindi