माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

#MIFF2022मध्ये सादर होणाऱ्या चित्रपटांच्या निवडीच्या निकषात तंत्रज्ञानविषयक पैलूंपेक्षा आशयाला अधिक महत्त्व देण्यात आले: आंतरराष्ट्रीय ज्यूरी मंडळ सदस्य


आशयगर्भ लेखन आणि पटकथा लेखनासाठी स्वतंत्र पारितोषिक श्रेणी निर्माण करण्याची सूचना देखील ज्यूरी मंडळाच्या सदस्यांनी केली

Posted On: 02 JUN 2022 4:55PM by PIB Mumbai

मुंबई, 2 जून 2022

 

मिफ्फ 2022 अर्थात 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटांचे परीक्षण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ज्यूरी मंडळामध्ये भारत आणि परदेशातील ज्येष्ठ चित्रपट निर्माते, संकलक, पत्रकार, रंगभूमीशी संबंधित व्यक्ती आणि निर्माते यांचा समावेश आहे. सध्या सुरु असलेल्या मिफ्फ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही परीक्षक मंडळी प्रसारमाध्यमे आणि इतर प्रतिनिधींसोबत होणाऱ्या #MIFFDialogues चर्चेत उत्साहाने सहभागी झाली तेव्हा त्यातून चित्रपट निर्मिती, उत्तम आशयाचे महत्त्व आणि नव्या तसेच उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी भविष्यात उपलब्ध होणाऱ्या संधींविषयी सांगणारा एक ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण संवाद घडून आला.

मीना रॅड (फ्रान्स) यांच्या अध्यक्षतेखाली, डॅन वॉलमन (इस्राएल), एस. नल्लमुथू (भारत), अनंत विजय (भारत), जॉन पिएर सेरा (फ्रान्स) यांनी या महोत्सवात ज्यूरी सदस्य म्हणून काम पहिले. आजच्या पत्रकार परिषदेला, अनंत विजय येऊ शकले नाहीत.

एस. नल्लमुथू (भारत)

पुरस्कारासाठी निवड करतांना तंत्रज्ञान बघितले जाते, की आशय महत्वाचा ठरतो, या प्रश्नाला उत्तर देतांना प्रसिद्ध वन्यजीव माहितीपट निर्माते, सुबिया नल्लमुथु म्हणाले, “प्रथमच चित्रपटनिर्मिती करणाऱ्या निर्मात्यांकडून तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण चित्रपटाची अपेक्षा करणे कठीण आहे.पण जेव्हा कथेचा आशय उत्तम असतो आणि पटकथा देखील चांगल्या प्रकारे लिहिलेली असते अशावेळी आम्ही तंत्रविषयक पैलूंना संपूर्णपणे विसरून जातो. खरे तर अनेक लघुपट आम्हाला आढळले, ज्यांची कथावस्तू आणि आशय पूर्णपणे नवा आणि मूळ आहे. मात्र त्यांना कुठलेही बक्षीस देणे शक्य नाही, म्हणूनच, आपल्याला अशा  महोत्सवात आशय, पटकथा आणि कथाकथनासाठी यापुढे पुरस्कारांची स्वतंत्र श्रेणी निर्माण करण्याची गरज आहे,अशी आम्हा सगळ्यांची सूचना आहे.”

“नव्या चित्रपट निर्मात्यांनी आकाराने लहान, चुरचुरीत आणि केंद्रीभूत कथाकथनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भावनिक आणि मनोरंजनात्मक मूल्याला देखील तितकेच महत्त्व आहे.” 

“#MIFF2022 मध्ये सादर झालेल्या चित्रपटांमधून खूप काही शिकायला मिळाले. चित्रपट निर्मात्यांनी स्वीकारलेल्या कथाकथनाच्या पद्धती आणि दृष्टीकोन यांतून चांगले शिक्षण मिळते. हे चित्रपट पाहणे अनि त्यांचे परीक्षण करणे हा अत्यंत उत्तम अनुभव होता.”

 

मीना रॅड (फ्रांस-इराण)

“मिफ्फ हा कार्यक्रम खरेतर केवळ चित्रपट महोत्सवापेक्षा खूप मोठा आहे; हे स्थळ म्हणजे विचारांचे आदानप्रदान करण्याची, निर्मिती करण्याची तसेच दक्षिण भारतीय चित्रपट निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती साजरी करण्याची जागा आहे.मिफ्फ मध्ये आम्ही संपूर्ण लक्ष एकाग्र करून अस्सलपणा दर्शविणाऱ्या,सुंदर पद्धतीचे कथाकथन तसेच अत्यंत उत्तम दृष्टीकोन असलेल्या देखण्या चित्रपटांचा आनंद घेत आहोत.”

“भारताची सांस्कृतिक ओळख दर्शविणाऱ्या चित्रपटांनी आम्हांला अधिक आकर्षित केले. चित्रपटांच्या माध्यमातून भूतकाळातील वारशाची माहिती करून देण्याविषयी चित्रपट विभाग आणि #MIFF2022 यांनी कसे लक्ष एकाग्र केले आहे हे पाहणे मनोरंजक आहे.

“चित्रपट निर्मात्यांनी कोणत्या स्थितीमध्ये अथवा परिस्थितीमध्ये चित्रपट निर्मिती केली आहे हे देखील चित्रपटांची निवड करताना आम्ही लक्षात घेतले. आशय, वर्णन, कथाकथन तसेच पटकथा फुलविण्याची पद्धत यांचा देखील विचार करण्यात आला.

“सामान्य प्रेक्षक थियेटर सोडून निघून जातील अशा प्रकारचे लांब चित्रपट तयार करण्यापेक्षा लघुकथा तयार करणे केव्हाही चांगले आहे. कमी लांबीच्या चित्रपटांमध्ये वितरण तसेच विपणनाच्या अधिक उत्तम शक्यता असतात.चित्रपट विभागाच्या मदतीने चित्रपट निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट जगभरातील लघुपटांना समर्पित उत्तमोत्तम चित्रपट महोत्सवात सादर करण्यासाठी पाठविण्याचा प्रयत्न करावा.”

एखाद्या व्यक्तिमत्वाविषयी, मग ते वास्तव असो, अथवा काल्पनिक, तुम्ही चित्रपट बनवत असाल, तर त्या व्यक्ती ‘विषयी’बनवू नका, त्या व्यक्ती ‘सोबत’, त्याच्या अंतरंगात शिरून सिनेमा बनवा, त्याच्यासोबत हा प्रवास करा’ असा संदेश त्यांनी नवोदित चित्रपट निर्मात्यांना दिला.

 

डॅन वॉल्मन (इस्त्रायल)

“कधीकधी, एखादा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या वाईट दर्जाचा असला तरीही तो अत्यंत प्रामाणिक आणि खरा असल्याचे दिसून येते. खूप जास्त प्रमाणात दिलेली माहिती चित्रपटाच्या भावनेला मारून टाकू शकते. #MIFF2022 मध्ये सादर झालेले काही चित्रपट खरोखरीच अत्यंत हृदयस्पर्शी होते आणि त्यांनी मला रडायला भाग पाडले.

“चित्रपट निर्मिती करताना कलाकारांनी त्यांच्या चित्रपटात भरगच्च माहिती देऊ नये यासाठी चित्रपट विभागाने त्यांना प्रोत्साहित करायला हवे.”

“महोत्सवासाठी चित्रपटांची निवड करताना परीक्षक मंडळाच्या सदस्यांमध्ये मतभेद होतच असतात. पण म्हणून काही त्यांच्यात मारामारी होत नाही.

 

जॉन पिएर सेरा (फ्रान्स)

“महोत्सवासाठी चित्रपटांची निवड करताना मी कोणताही चित्रपट आपल्या सध्याच्या जीवनाशी संबंधित आहे की नाही हे पाहतो. निवड झालेल्या चित्रपटांकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व चित्रपट आजच्या काळाशी संबंधित आहेत. #MIFF2022 साठी राबविलेली निवड प्रक्रिया तसेच चाचण्या अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. 

“या महोत्सवासाठी निवडण्यात आलेले  सर्व चित्रपट वैविध्यपूर्ण आणि मनोरंजक आशय असलेले होते. चित्रपट निवडताना चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी केलेले संशोधन देखील लक्षात घेण्यात आले.”

मिफ्फ 2022 मधील ज्यूरी सदस्यांविषयी आणखी जाणून घेण्यासाठी:

* * *

PIB MIFF Team | R.Aghor/S.Chitnis/Darshana/MIFF-45

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830507) Visitor Counter : 247


Read this release in: Hindi , Urdu , English