माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पोर्तुगालच्या सुप्रसिद्ध अॅनिमेटर रेजिना पसोवा, माणिपुरी माहितीपट निर्माते दिग्दर्शक पबन कुमार, यांचा मिफ्फसंवाद मध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद


'मॅन अँड द वाईल्ड' माहितीपटाचेचे दिग्दर्शक शांतनु सेन आणि ‘केज्ड’ या लघुपटाच्या दिग्दर्शिका ‘लिझा मैथ्यू यांनी सांगितले आपल्या चित्रपट निर्मितीचे अनुभव

Posted On: 02 JUN 2022 4:22PM by PIB Mumbai

मुंबई, 2 जून 2022

 

मुंबईत सुरु असलेल्या सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजच्या पाचव्या दिवशी, झालेल्या मिफ्फसंवाद मध्ये, पोर्तुगालच्या सुप्रसिद्ध अॅनिमेटर रेजिना पसोवा, भारतीय अॅनिमेटर ध्वनि देसाई, मणिपूरचे प्रसिद्ध माहितीपट निर्माते होबम पबन कुमार, 'मॅन अँड द वाईल्ड' या माहितीपटाचे दिग्दर्शक शांतनु सेन आणि ‘केज्ड’ या लघुपटाच्या दिग्दर्शिका, लिझा मैथ्यू  यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

रेजिना पेसोआ

रेगिना पेसोआ ह्या पोर्तुगालच्या ऍनिमेशन फिल्मनिर्मात्या आहेत. 

रेजिना पसोवा यांनी एक अॅनिमेटर म्हणून आपल्या सिनेमाबद्दल बोलतांना संगितले की, त्यांनी कधीही सिनेमानिर्मितीचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. त्या एक चित्रकार आहेत, आणि त्यातूनच त्यांनी स्वतःच चित्रातून अॅनिमेशम कला विकसित केली. पोलिश अॅनिमेशममध्ये वापरले गेलेले प्लास्टर प्लेट्सचे तंत्र स्वतः शिकून विविध प्रयोग करुन 1999 मध्ये त्यांनी आपली पहिली अॅनिमेशम फिल्म, '"द नाईट' बनवली. हा सगळा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.

त्यानंतर त्या ऍनिमेशन मध्ये अशाच विविध तंत्राचा वापर करत असतात. त्यांचे ऍनिमेशनपट, 'ट्रॅजिक स्टोरी विथ ए हॅपी एन्ड', काली-द लिटिल व्हॅपायर' आणि अंकल थॉमस अकौंटिंग फॉर द डेस' जगभरात वाखाणले गेले आहेत. अनेक महोत्सवांमधर त्यांचे ऍनिमेशन पट दाखवले जात असून, त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांचे आठ ऍनिमेशन पट 'रेट्रोस्पेक्टिव्ह' या विभागात दाखवले जात आहेत.

या सर्व अॅनिमेशन सिनेमांचे संकलन करणाऱ्या प्रसिद्ध अॅनिमेटर ध्वनि देसाई देखील यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी या महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय निवड समितीच्या सदस्य म्हणूनही काम पहिले आहे. लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशन पटांची निवड करणे, खूप आनंदादायी अनुभव होता, असे त्यांनी संगितले.

 

होबम पबन कुमार

होबम पबन कुमार मणिपूरचे सुप्रसिद्ध माहितीपट निर्माते-दिगदर्शक आहेत.त्यांचे '50 इयर्स ऑफ मणिपुरी सिनेमा: अ ग्लिम्पस,' फ्यूम शांग’ आणि पबन श्याम शर्मा यांच्यावरील माहितीपट ‘पबन श्याम’ या महोत्सवात दाखवले जात आहेत. मणिपुरी चित्रपटाचा 50 वर्षांचा प्रवास या माहितीपटात दाखवला आहे. मणिपुरी चित्रपट सृष्टीतील महत्वाचे चित्रपट निर्माते, दिगदर्शक आणि कलाकारांचा प्रवास आणि त्यांचे योगदान यात दाखवले आहे. आपल्या सिनेमाविषयी बोलतांना, पबन कुमार म्हणाले, की माणिपूरच्या चित्रपट सृष्टिचे आधारस्तंभ आणि त्यांचे गुरु पबन श्याम शर्मा यांच्यावर सिनेमा बनवणे, हा अत्यंत हृद्य अनुभव होता, त्यांचं योगदान प्रभावीपणे देशभरात आणण्याचा प्रयत्न केला असे, त्यांनी सांगितले.

 

दिगदर्शक- शांतनु सेन- मॅन अँड द वाईल्ड' -

व्यवसायाने शेतकरी असलेले समीर बोर्डोई निसर्गाच्या खूप जवळ असतात. निसर्ग मानवाच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो, मात्र त्याचा लोभ नाही, यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. त्यांच्या गुवाहाटी शहरापासून साधारण 25 किलोमीटरवर असलेल्या एका टेकडीवर त्यांनी स्वतः परिश्रम करुन एक जंगल तयार केलं असतं, जिथे ते मानव आणि प्राणी अशा दोन्ही घटकांसाठी नैसर्गिक रित्या उगवलेलं अन्न तयार करतात. एवढंच नाही, तर इतरांनाही निसर्गासोबत सहजीवन जगता यावं यासाठी, त्या जंगलातच प्रशिक्षण शिबिरं घेतात. यातून ते निसर्ग संवर्धनासाठी 'हरितयोद्धे' तयार करतात. निसर्ग संरक्षण आणि संवर्धनाची ही साखळी पुढे पुढे जात राहते.

आपण 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' पाहिलं आहे. मानव आणि वन्य प्राण्यांच्या अधिवास अतिक्रमणामुळे निर्माण होणारा 'मानव वन्यजीव संघर्ष' पहिला आहे. मात्र, समीर बोर्डोई असे भूमिपुत्र आहेत जे भूमीचं ऋण तर फेडतातच, पण सहजीवनाचा हा वसा इतरांनाही देतात. त्यांचीच कथा दिगदर्शक शंतनु सेन यांनी या ' मॅन अँड द वाईल्ड' महितीपटातून प्रेक्षकांसमोर आणली आहे.

 

लिझा मैथ्यू - ‘केज्ड’

अमेरिकेतील दिग्दर्शिका लिझा मैथ्यू  यांचा पहिलाच चित्रपट ‘केज्ड’ देखील या महोत्सवात, प्रीझम विभागात दाखवला गेला. या मिफ्फ संवाद मध्ये त्यांनी आपल्या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास सांगितला. हा त्यांचा पहिलाच चित्रपट असून, तो महिलांवर होणाऱ्या विविध अत्याचारांवर भाष्य करतो. कोविड महामारीच्या काळात, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रमाणात सुमारे 30 टक्के वाढ झाली. त्यात केवळ, शारीरिक अत्याचारच नाही, तर मानसिक,भावनिक अत्याचार, एकटेपणा यांचाही समावेश होता. या सगळ्यावर बोलायला हवं,असं वाटून त्यातूनच या सिनेमाची प्रेरणा मिळाली असे लिझा यांनी सांगितले. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यासाठी सगळ्या महिला कलाकार, तंत्रज्ञांनीच काम केले आहे. सिनेमात चार महिलांच्या आयुष्याची कथा विणली असून त्यातील एक तृतीयपंथीही आहे, असं त्यांनी सांगितलं. 


* * *

PIB MIFF Team | R.Aghor/Darshana/MIFF-44

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830494) Visitor Counter : 174


Read this release in: English , Urdu , Hindi