पंचायती राज मंत्रालय

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी उलटगणती सुरू झाली असून पंचायत राज मंत्रालयाने यानिमित्ताने योग उत्सवाचे केले आयोजन

Posted On: 01 JUN 2022 8:37PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 1 जून 2022

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची उलटगणती सुरू झाली असून त्यानिमित्ताने देशभरात आयोजित होणाऱ्या पूर्व कार्यक्रमांचा एक भाग म्हणून पंचायत राज मंत्रालयाच्या आवारात एक विशेष कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. पंचायती राज मंत्रालय  यात सामील झाले.

यानिमित्ताने आजपासून ते आंतरराष्ट्रीय योग दिवस, 2022 पर्यंत साजऱ्या होणाऱ्या योग उत्सव –21 याची संकल्पना: मानवतेसाठी योग ही असून यात दररोज सादर होणाऱ्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व या विषयावर एका व्याख्यानासह-प्रात्यक्षिक सत्र आयोजित करण्यात आले होते.

या योग उत्सवाच्या कार्यक्रमात मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी-सदस्यांचा उत्साही सहभाग दिसून आला.21 जून, 2022 रोजी होणाऱ्या

या कार्यक्रमाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी,राज्ये / केंद्रशासित प्रदेशांतील पंचायती राज विभाग आणि पंचायती राज संस्थांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्सवाबाबत प्रमुख हितसंबंधितांमधे जागरुकता निर्माण करण्यासाठी आभासी माध्यमाद्वारे वेब-लिंक सामायिक केली गेली.  

आयुष मंत्रालयाच्या, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने नियुक्त केलेल्या योग प्रशिक्षकांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व यावर थोडक्यात सादरीकरण केले. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा) प्राध्यापक-सदस्य श्री तनुज यादव यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले, तर श्री मुरुली एम.आर.यांनी योगासनांशी प्रात्यक्षिके, योगा ब्रेक(Y- ब्रेक),यासंबंधित विविध योगासने/ मुद्रा/ व्यायाम प्रकार यांची प्रात्यक्षिके करून दाखवली,जे योगव्यायाम, तणावमुक्ती करण्यासाठी, ताजेतवाने होण्यासाठी आणि कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी साध्या आणि उपयुक्त योग पद्धतींचा समावेश असलेले शिष्टसंमत वर्तन आहे आणि कामाच्या ठिकाणी व्यक्तींची कार्यशीलता वाढविण्यास मदत करतात.

या उलटगणती कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायती राज मंत्रालय सचिव,श्री सुनील कुमार होते आणि त्याचे सूत्रसंचालन पंचायती राज मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार डॉ. बिजय कुमार बेहरा,यांनी केले.यावेळी बोलताना पंचायती राज मंत्रालयाचे सचिव श्री सुनील कुमार यांनी सर्व सहभागींना शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासनांना त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन केले.योग-ब्रेकचा सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी-सदस्यांना मोठा लाभ होऊ शकतो,हे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येकाने नियमितपणे योगाभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण यामुळे सर्वांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि दैनंदिन जीवनात शरीर आणि मन स्वच्छ आणि कामावर केंद्रित करण्यास मदत होईल,अशी सूचना केली.डॉ.बी.के. बेहरा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना निरोगी आणि संतुलित जीवनासाठी योगाचा अवलंब करण्याचे यावेळी आवाहन केले.


 

 

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830254) Visitor Counter : 168


Read this release in: English , Urdu , Hindi