माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चित्रपटांसाठी संगीत संयोजन करणे हे भावना व्यक्त करण्याचे माध्यम : सुप्रसिद्ध संगीतकार रामप्रसाद सुंदर यांचे मिफ्फ कार्यशाळेत प्रतिपादन


एक उत्तम संगीतकार तुम्ही चित्रपट पाहण्यापूर्वीच त्यातील भावनांची अनुभूती घडवू शकतो

Posted On: 01 JUN 2022 8:35PM by PIB Mumbai

मुंबई, 1 जून 2022

 

संगीत संयोजन म्हणजे भावनांची अभिव्यक्ती करण्यासारखेवच आहे . एक महान संगीतकार तुम्ही संपूर्ण चित्रपट पाहण्यापूर्वीच त्यातील भावनांची अनुभूती घडवू शकतो असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संगीतकार रामप्रसाद सुंदर यांनी व्यक्त केले.मुंबईत सध्या सुरु असलेल्या मिफ्फ 2022 अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. “संगीत हा कोणत्याही चित्रपटाचा अविभाज्य भाग असतो. अगदी सुरुवातीपासून चित्रपटाचा शेवट होईपर्यंत त्याला कायम संगीताची जोड मिळालेली असते. म्हणूनच कोणत्याही चित्रपट निर्मात्याने निर्मितीच्या मधल्याच टप्प्यात किंवा निर्मिती-पश्चात काळात संगीत संयोजन सुरु करू नये. चित्रपट निर्मितीच्या अगदी सुरुवातीच्या क्षणापासूनच संगीताची साथ मिळायला हवी,” ते पुढे म्हणाले.

17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध कार्यक्रमांसोबत आज ‘लघुपट आणि माहितीपटांसाठी संगीत संयोजन’ या संकल्पनेवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या चित्रपट निर्मिती क्षेत्रातील विविध व्यक्तींना संबोधित करताना रामप्रसाद म्हणाले की, चित्रपट, दूरचित्रवाणी तसेच नाटक यांची सुरुवात होण्याआधीपासूनच संगीत आपल्या सोबत आहे. संगीत ही स्वतःच एक भाषा आहे आणि चित्रपट निर्मिती प्रक्रियेत मुलभूत संवाद माध्यम म्हणून या  भाषेचा उपयोग व्हायला हवा असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की माहितीपटामध्ये, अशा प्रकारे संगीत संयोजन केले जाते की जेव्हा निवेदकाचे किंवा पडद्यामागील बोलणे सुरु होते त्याच वेळी, त्याच्या सोबतच संगीत देखील वाजत राहते. या पद्धतीमुळे प्रेक्षकांना डोळ्यांसमोर दिसणाऱ्या दृश्यातील भावना समजण्यास मदत होते.

संगीतक्षेत्रातील ब्रँडिंगच्या महत्त्वाबाबत विवेचन करताना, रामप्रसाद म्हणाले, “या ब्रँडिंगचा अर्थ असा होतो की केवळ संगीत ऐकून त्याचा ब्रँड अथवा नाव लक्षात आले पाहिजे. संगीतकार/ कलाकाराची अचून निवड, सादरीकरणाची स्पष्ट कल्पना, सादरकर्त्याकडे असलेली संगीताची श्रेणी, सर्जक आविष्कार, योग्य संगीत मेळ्याशी संपर्क ही उत्तम संगीत सादरीकरणाची मुलभूत तत्वे आहेत.”

माहितीपट आणि लघुपट यांचा प्रेक्षकांवरचा प्रभाव सुनिश्चित करण्यात संगीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. या संदर्भात, नेटफ्लिक्स मंचाने उत्तम प्रकारचे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत संयोजन प्रकार भारतात आणण्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. नेटफ्लिक्सने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमध्ये माहितीपट आणि लघुपट यांच्यासाठी संगीतरचना करण्याच्या प्रक्रियेची तपशीलवार माहिती  देण्यात आली. कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना यातून संगीताच्या विविध पद्धती आणि प्रकार यांच्यासह संगीत संयोजनाचे एक मोठे विश्व खुले झाले.

रामप्रसाद सुंदर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीत संयोजक आणि ध्वनी रचनाकार आहेत. चेन्नई येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेला प्रस्थान केले. त्यांनी लॉस एँजेलीस येथील न्यूयॉर्क विद्यापीठ आणि एआर, व्हीआर तसेच व्हिडिओ गेम्स यांच्यासाठीची व्हिडीओ सिम्फनी या संस्थेतून संगीत संयोजनाची पदवी मिळविण्याचा त्यांचा उद्देश होता. संगीत संयोजक तसेच ध्वनी रचनाकार म्हणून  ते, रिमोट कंट्रोल प्रोडक्शन (हान्स झिमर),कटिंग एज ग्रुप,ऑडीसी, आउटपुट आयएनसी., नेटिव्ह इन्स्ट्रुमेन्ट्स आणि अॅपल यांच्यासारख्या अनेक प्रख्यात संस्थांशी संबंधित आहेत. ओटीटी मंचावरील प्रमुख कंपनी असलेल्या नेटफ्लिक्सशी ते नुकतेच जोडले गेले आहेत आणि तेथे ते भारताच्या संगीत सर्जन तसेच निर्मिती विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत असून ते या पदावरून नेटफ्लिक्स च्या भारतातील मालिका, चित्रपट तसेच नॉन-फिक्शन प्रकारच्या कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी मदत करत आहेत.

 

* * *

PIB MIFF Team | R.Aghor/S.Chitnis/Darshana/MIFF-42

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830230) Visitor Counter : 258


Read this release in: English , Urdu , Hindi