माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'वर्ल्ड्स मोस्ट फेमस टायगर' चित्रपटाच्या रुपाने जगातील सर्वात प्रसिद्ध वाघाचा @ #MIFF2022 मधे विहार
Posted On:
01 JUN 2022 7:40PM by PIB Mumbai
मुंबई, 1 जून 2022
17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुब्बिह नल्ल मुथू यांचा ‘द वर्ल्ड्स मोस्ट फेमस टायगर' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता माहितीपट दाखवला जाणार आहे. फिल्म्स डिव्हिजन संकुलातील जेबी हॉलमध्ये 2 जून 2022 रोजी दुपारी 3.45 वाजता याचे विशेष सादरीकरण होणार आहे. ‘वाइल्डलाइफ फिल्ममेकिंग अॅज अ करिअर’ अर्थात व्यवसाय कारकीर्द म्हणून वन्यजीवनांवर आधारित चित्रपट निर्मिती या विषयावर सुब्बिह नल्ल मुथू यांचा मास्टर क्लासही त्यानंतर ठिकाणी आयोजित केला जाईल.
रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध वाघीण मछली (T-16) वरील 44 मिनिटांच्या माहितीपटाने 2019 मध्ये 'सर्वोत्कृष्ट भारतीय पर्यावरण चित्रपट' गटात राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. हा चित्रपट मछलीच्या जन्मापासून ते तिच्या मृत्यूपर्यंतचे जीवन, तिच्या त्या भागातील सत्तेचा उदय, तिचा हृदयद्रावक अंत आणि तिने मागे सोडलेला असाधारण वारसा यावर आधारित आहे.
एकेकाळी रणथंबोरची शान असलेली मछली ‘लेडी ऑफ द लेक’, ‘क्वीन ऑफ रणथंबोर’ आणि ‘क्रोकोडाइल किलर’ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जात असे तिला जगातील सर्वाधिक छायाचित्रित वाघिण म्हणूनही ओळखले जाते. मछली तिच्या शिकार कौशल्यासाठी आणि सामर्थ्यासाठी ओळखली जात होती. 2003 मध्ये तिने 12 फूट लांबीच्या मगरीशी झुंज घेत मारले होते. 18 ऑगस्ट 2016 रोजी या शाही वाघिणीचे निधन झाले.
सुब्बिह नल्लमुथु यांना वन्यजीव चित्रपट निर्मितीसाठी पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पर्यावरण आणि मानव तसेच परिसंस्थेतील परस्परसंवादावर असंख्य माहितीपट बनवले आहेत. यात बीबीसी वर्ल्डसाठी 'अर्थ फाइल' आणि एनिमल प्लॅनेटसाठी 'द वर्ल्ड गॉन वाइल्ड' यांचा समावेश आहे. नल्लमुथू जॅक्सन होल वाइल्डलाइफ फिल्म फेस्टिव्हलचे नियमित ज्युरी सदस्य आहेत आणि त्यांनी इंडियन पॅनोरमा फिल्म फेस्टिव्हलचे (2021) ज्युरी अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. रॉयल बेंगाल वाघांबद्दलची त्यांची आस्था-प्रेम नॅशनल जिओग्राफिक वाहिनी आणि बीबीसीसाठी पाच व्याघ्रकेंद्रित आंतरराष्ट्रीय माहितीपटांमध्ये प्रतिबिंबीत झाली आहे. सुब्बिह नल्लमुथु हे #MIFF2022 च्या आंतरराष्ट्रीय ज्युरीचे सदस्य आहेत.
* * *
PIB MIFF Team | R.Aghor/V.Ghode/Darshana/MIFF-41
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830225)
Visitor Counter : 145