माहिती आणि प्रसारण मंत्रालय

चित्रपट हा प्रत्येक व्यक्तीचा जागतिक जन्मसिद्ध हक्क: रिझवान अहमद @ #MIFF मास्टर क्लासेस


"रुपेरी पडदा आणि ओटीटी व्यासपीठ यांच्यात सहयोगी संबंध आवश्यक"

Posted On: 01 JUN 2022 4:00PM by PIB Mumbai

मुंबई, 1 जून 2022

 

कोविड 19 महामारीने जगभरातील चित्रपट बघण्याबाबत डिजिटल परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती दिली आहे. महामारीने लोकांना घरामध्ये थांबण्यास भाग पाडले, त्यामुळे घरात बसून ओटीटी मंच पाहणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.  पण चित्रपटगृहांपासून ओटीटी मंचापर्यंतच्या सिनेमाच्या या प्रचंड परिवर्तनामध्ये, काही भौगोलिक क्षेत्रे, लोक आणि संस्कृती पूर्णपणे वगळल्या गेल्या आहेत का?  ओटीटी मंच, पारंपारिक चित्रपटगृहांसाठी मृत्यूची घंटा ठरु पाहतेय आहे का?  ओटीटी आणि रुपेरी पडदा एकत्र चालू शकतात का? 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मास्टर क्लासमधे या सुसंगत प्रश्नांवर चर्चा झाली आणि त्याची उत्तरे देण्यात आली. 

हैदराबाद इथल्या इंस्ट्रक्शनल मीडिया सेंटर, MANUU, चे संचालक रिजवान अहमद यांनी मास्टर क्लासचे नेतृत्व केले. ते इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म टेलिव्हिजन अँड ऑडिओव्हिज्युअल कम्युनिकेशन (ICFT), पॅरिस आणि इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी असोसिएशन, लॉस एंजेलिसचे पूर्णवेळ सदस्य आहेत.

चित्रपट हा या जगातील प्रत्येक व्यक्तीचा जागतिक जन्मसिद्ध हक्क आहे असे रिजवान अहमद म्हणाले.

“नवीन व्यासरीठावर सिनेमाचा विस्तार करण्यासाठी जगाच्या अनेक भागांमध्ये अपेक्षित पायाभूत सुविधा नाहीत.  संसाधनांचे असमान वितरण हे सर्वात मोठे आव्हान आहे. तुम्ही भारतातील परिस्थितीचाच विचार केला तर फक्त 47% प्रेक्षकांना इंटरनेट उपलब्ध आहे.  उर्वरित 53% लोकसंख्येलाही ओटीटी  वर उपलब्ध समृद्ध कलाकृती  पाहण्याचा अधिकार आहे”, असे ते  म्हणाले. ओटीटी व्यासपीठांनी बहुसंख्य वंचित ग्रामीण लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी एक कार्यपद्धती तयार करणे आणि स्वतंत्र व्यवसाय प्रारुप तयार करणे आवश्यक आहे असे रिझवान यांनी सांगितले.

ओटीटी व्यासपीठ पारंपारिक चित्रपटगृहांना अडगळीत टाकण्याची भीती अनाठायी असल्याचे अहमद म्हणाले. ओटीटी कधीही चित्रपट पाहण्याचा अनुभव आणि चित्रपटगृहात मिळत असलेल्या सामाजिक उत्सवाची प्रतिकृती ठरु शकत नाही. “रुपेरी पडदा विरुद्ध ओटीटीचा वादाला योग्य दिशा नाही. तांत्रिक प्रगती होत राहील. ती थांबवता येणार नाही. इथे आपल्याला संतुलित दृष्टीकोन आवश्यक आहे. रुपेरी पडदा आणि ओटीटी व्यासपीठ यामध्ये सहयोगी संबंध असणे आवश्यक आहे. चित्रपटगृह मालकांनी लोकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण रणनीती आखणे आणि दृष्टीकोन शोधणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

इथल्या प्रत्येक प्रदेशाची सांस्कृतिक ओळख आहे. कलाकृती तयार करताना ओटीटी व्यासपीठांनी त्याचा आदर करणे आवश्यक आहे. ओटीटी हा सिनेमात होत असलेल्या डिजिटल परिवर्तनाचा शेवट नाही हेही रिझवान अहमद यांनी अधोरेखित केले.  "फ्री अॅड-सपोर्टेड स्ट्रीमिंग टीव्ही सर्व्हिसेस (फास्ट) सारखे व्यासपीठ लोकप्रिय होत आहेत आणि ही प्रक्रिया सुरूच राहील", असे सांगत त्यांनी समारोप केला. 


* * *

PIB MIFF Team | R.Aghor/V.Ghode/Darshana/MIFF-36

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830091) Visitor Counter : 135


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil