माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“आमचे विरुद्ध त्यांचे असा विचार मनात येता कामा नये”- भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन चित्रपटांचे कौतुक करण्याचा संजित नार्वेकर यांचा चित्रपटरसिकांना सल्ला
जाहिरातींनी मल्टिप्लेक्समध्ये माहितीपटांची जागा घेतली आहे- प्रेमानंद मुझुमदार
Posted On:
31 MAY 2022 10:20PM by PIB Mumbai
मुंबई, 31 मे 2022
लोकांनी अनेक बदल अनुभवले किंबहुना अनेक दशकांच्या कालखंडात चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रयोगांची हाताळणी झाली, विशेषतः माहितीपटांच्या निर्मितीमध्ये हे प्रयोग झाले. 17व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज तिसऱ्या दिवशी भारतीय माहितीपट निर्माते संघटनेने(आयडीपीए) ‘माहितीपट निर्मितीचा 75 वर्षांचा प्रवास आणि वृद्धी आणि सीएसआरचे अर्थसहाय्य कशा प्रकारे माहितीपटांच्या सामाजिक परिदृश्यात योगदान देते’ या विषयावर चित्रपट समुदायातील नामवंत व्यक्तिमत्वांच्या सहभागाने आणखी एका प्रेरणादायी आणि उद्बोधक खुल्या मंचाचे आयोजन केले.

या सत्रामध्ये व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विजेते माहितीपट निर्माते आणि अकादमी मार्गदर्शक संजित नार्वेकर यांनी लोकांमध्ये स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांसंदर्भात असलेल्या पूर्वग्रहांविषयी विवेचन केले. फली बिलिमोरिया, क्लेमेंट बाप्टिस्टा, सुखदेव आणि बी डी गार्गा यांसारख्या श्रेष्ठ माहितीपट निर्मात्यांची त्यांनी उदाहरणे दिली, ज्यांनी फिल्म्स डिव्हिजन आणि कॉर्पोरेट प्रायोजक या दोघांसाठी कोणताही किंतु न बाळगता भेदभाव न करता मुक्तपणे काम केले. अतिशय नावाजलेल्या कलाकृतींची निर्मिती करणाऱ्या सत्यजित रे, जी अरविंदन, अदूर गोपालकृष्णन आणि श्याम बेनेगल यांच्यासारख्या देशभरातील दिग्गजांचा त्यांनी उल्लेख केला. “शेवटी विचार करायचा झाला तर भारतीय माहितीपटाला बळ देण्यासाठी प्रयत्न करताना लोकांनी एक स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आणि त्या पलीकडे देखील विचार केला पाहिजे आणि पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका आणि इतर अनेक आग्नेय आशियायी माहितीपट पाहण्यास पसंती दिली पाहिजे. त्यामुळे आमचे विरुद्ध त्यांचे असा विचार देखील मनात येऊ देणे टाळण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

फिल्म सोसायटी ऍक्टिविस्ट प्रेमान्द्र मुझुमदार यांनी अगदी लहान वयापासूनच माहितीपट पाहण्याच्या त्यांच्या अनुभवांची माहिती उपस्थित प्रेक्षकांना दिली. व्यावसायिक मल्टिप्लेक्सेसच्या आगमनाबरोबरच माहितीपटांची जागा जाहिरातींनी घेतली आणि आता पूर्वीसारखे चित्रपटांच्या आधी माहितीपट दाखवणे बंधनकारक राहिलेले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळेच भारतातील माहितीपटांच्या वितरणाबाबत आता प्रश्न उपस्थित झाला आहे. 1995 नंतर सर्वात पहिल्या राज्य पुरस्कृत चित्रपट महोत्सवात- पश्चिम बंगालमधील आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात(आता कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जाणारा) माहितीपट प्रदर्शित करणारा विभागच नव्हता. शेवटी 2002 मध्ये सरकारला माहितीपट आणि शॉर्ट फिक्शनपट प्रदर्शित करण्यासाठी समांतर महोत्सव आयोजित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला, ज्याला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळाले. यापूर्वी प्रेक्षकांमध्ये माहितीपट पाहण्याची संस्कृती रुजलेली नव्हती अगदी फिल्म सोसायटीतही लोकांना जास्त लांबीचे आशय असलेले चित्रपट पाहण्यातच रस होता. माहितीपट पाहण्याची आणि त्यांचा आस्वाद घेण्याची संस्कृती वाढवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले. सध्या देशभरात सुमारे 350 फिल्म सोसायट्या आणि सुमारे 100 कॅम्पस फिल्म सोसायट्या सक्रियपणे कार्य करत आहेत”, असे त्यांनी सांगितले.

सीएसआर सल्लागार पंकज जयस्वाल यांनी या चर्चेच्या अनुषंगाने बोलताना सांगितले की माहितीपटांच्या व्यावसायिक व्यवहार्यतेबाबत तडजोड केली जात आहे मात्र सीएसआरच्या स्थापनेमुळे सरकार माहितीपटांच्या निर्मात्यांना एक संधी देत आहे ज्यामध्ये कॉर्पोरेट्सनी त्यांच्यासाठी काही तरतूद करून आपले उत्तरदायित्व घेतले पाहिजे. यापूर्वी पैसे खर्च करण्यासाठी कॉर्पोरेट्स थोडे साशंक असायचे मात्र जानेवारी 2001 पासून सरकारने सीएसआरसाठी 2% खर्च अनिवार्य केला आहे आणि जर तसे झाले नाही तर त्यावेळी संबंधित अधिकारीवर्ग त्यासाठी उत्तरदायी असेल. सीएसआर निधीबाबत समाविष्ट करण्यात आलेल्या परिशिष्ट सातबाबत ते बोलत होते. महिला सक्षमीकरण, लिंग-समानता याबाबत जागरुकता निर्माण करणारे किंवा कॉर्पोरेट गृहांकडून निधी मिळवण्यामध्ये सहाय्य करणारे शिक्षण यांसारख्या विषयांवर माहिती पट बनवण्याच्या आवश्यकतेबाबत त्यांनी भाष्य केले. चित्रपट निर्माते आणि अकॅडमिशियन संतोष पाठारे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

* * *
PIB MIFF Team | R.Aghor/S.Patil/Darshana/MIFF-34
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829932)
Visitor Counter : 153