माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आम्हाला आमच्या आशयाला ‘रॉकस्टार’ बनवायचे आहे : दिग्दर्शक राजकुमार शाह


विषयाशी असलेला 'बंध'च माहितीपट अद्वितीय बनवतो : दिग्दर्शक बोरून थॉकचोम

Posted On: 31 MAY 2022 10:05PM by PIB Mumbai

मुंबई, 31 मे 2022

 

सहानुभूती दाखवण्याऐवजी, आम्ही आमचे असे कथा विषय  सादर करू की तेच  ‘रॉक स्टार’  ठरतील, असे मनोगत ‘मून ऑन द मॅन’ या माहितीपटाचे दिग्दर्शक प्रिन्स शाह यांनी व्यक्‍त केले. “पात्रातील त्रुटी प्रेक्षकांना दाखवू नयेत यासाठी आम्ही सावध होतो. माहितीपटातील दोन पात्रे आमच्या आयुष्यात आली. आम्ही त्यांचे अनुसरण करू लागलो, कालांतराने ही पात्रे आमच्या कुटुंबाचा भाग बनली”, असेही त्यांनी सांगितले.  

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 17 व्या आवृत्तीमध्‍ये  आयोजित केलेल्या मिफ संवाद कार्यक्रमामध्ये प्रिन्स शाह यांनी प्रसार माध्‍यमाला आणि महोत्सवात सहभागी झालेल्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. ‘आय राइज’ या माहितीपटाचे दिग्दर्शक बोरून थॉकचोम, ‘मून ऑन द मॅन’चे निर्माते अंशुल पांडे आणि ‘मून ऑन द मॅन’चे सिनेमॅटोग्राफर वैभव हेही पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.

माहितीपटाची  निर्मिती कशी झाली याविषयी प्रिन्स शाह म्हणाले की,  'मून ऑन द मॅन' हा  दोन व्यक्तींच्या वास्तविकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. “एक म्हणजे प्रॅक्लॉन, भारतातील सर्वात तरुण स्वातंत्र्यसैनिक, ज्याने नंतर महान चित्रपट निर्माता गुरुदत्त यांच्यासोबत काम केले. दुसरी व्यक्ती म्हणजे मास्टर शैलेश, त्याच्या काळातील सर्वात व्यग्र  बालकलाकार. मास्‍टर शैलेश यांनी बालकलाकार म्हणून जवळपास 55-60 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र गेल्या 30-40 वर्षांपासून तो रस्त्यावर राहत आहे. हा माहितीपट त्यांच्या सद्यस्थितीवर  प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणि इतर अनेक समस्या, प्रश्‍नही  उपस्थित  करतो,” त्याने स्पष्ट केले.

 

माहितीपट चित्रित  करताना व्यक्तिरेखेच्या   मनात सहजता  असली पाहिजे आणि यासाठी   कॅमेऱ्याची भूमिका  महत्त्वाची असते, असे ‘आय राइज’चे दिग्दर्शक बोरून थॉकचॉम यांनी सांगितले. माहितीपट  अनोखा बनवण्यासाठी विषयाशी आपले चांगले बंध जोडणे खूप महत्त्वाचे आहे. हे घडण्‍यासाठी जरूर वेळ लागेल. या माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी पाच ते सहा वर्षे लागली. इथे गुणवत्तेला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व  दिले आहे,’’ असे ते पुढे म्हणाले.  ‘आय राइज’ हा मणिपूरमधील महिला मुष्ठीयोद्धा   लैशराम सरिता देवी यांच्या जीवनावर आधारित माहितीपट आहे.


* * *

PIB MIFF Team | Jaydevi PS/S.Bedekar/Darshana/MIFF-33

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1829930) Visitor Counter : 173


Read this release in: Hindi , English , Urdu