इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

गांधीनगर येथील आयआयटी या संस्थेत परम अनंत या सुपर कॉम्प्युटरची करण्यात आली स्थापना

Posted On: 30 MAY 2022 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) यांच्या संयुक्त सहयोगाने - राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन (NSM) अंतर्गत आयआयटी गांधीनगर येथे 'परम अनंत', नावाचा एक अत्याधुनिक सुपर कॉम्प्युटर आज दिनांक 30 मे 2022 रोजी समूह समन्वयक आणि वैज्ञानिक श्रीमती. सुनीता वर्मा, यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला. या समारंभाला आयआयटी गांधीनगरचे कार्यकारी संचालक. अमित प्रशांत, कर्नल ए.के.नाथ (निवृत्त), कार्यकारी संचालक, सी-डॅक, पुणे;इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY)राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशनच्या एचपीसी(NSM- HPC)विभागाचे श्री नवीन कुमार, विभाग, MeitY; डॉ. हेमंत दरबारी, प्रकल्प व्यवस्थापक -एनएसएम,सहयोगी प्रमुख/शास्त्रज्ञ 'F',‌डॉ नम्रता पाठक,वरिष्ठ संचालक डीएसटी; श्री संजय वांधेकर,सी-डॅकचे (C-DAC) सहाय्यक संचालक, श्री प्रशांत दिंडे,सी-डॅकचे सहाय्यक उपसंचालक,, श्री बीएसव्ही रमेश, सहसंचालक, यांच्यासह सी-डॅक आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील (MeitY),डीएसटी( DST), तसेच आयआयटी (IIT) गांधीनगर आणि सी- डॅकचे(C-DAC) वरिष्ठ अधिकारी यांची स
न्माननीय उपस्थिती होती.

सुपरकॉम्प्युटिंग सुविधा ही एनएसएमच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत स्थापन करण्यात आली आहे, ज्यामधे ही प्रणाली तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बहुतेक घटकांचे उत्पादन आणि जोडणी देशातच केली गेली आहे, तसेच यात मेक इन अंतर्गत सी-डॅकने विकसित केलेल्या स्वदेशी सॉफ्टवेअर स्टॅकचा, वापर करण्यात आला आहे.

एनएसएम अभियानाअंतर्गत 838 टेराफ्लॉप्स सुपरकॉम्प्युटिंग सुविधेची स्थापना करण्यासाठी 12 ऑक्टोबर 2020 रोजी आयआयटी गांधीनगर आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट इन अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग,सी-डॅक (C-DAC) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला होता. विविध वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी अनुप्रयोगांच्या संगणकीय गरजा पूर्ण करण्यासाठी ही प्रणाली सीपीयू(CPU) नोड्स, जीपीयू(GPU) नोड्स, हाय मेमरी नोड्स, हाय थ्रुपुट स्टोरेज आणि उच्च कार्यक्षमता असलेला इन्फिनिबँड इंटरकनेक्टच्या यांची एकत्रितपणे बांधणी करण्यात आली असून तो सुसज्ज आहे.

परम अनंत सिस्टीम डायरेक्ट कॉन्टॅक्ट लिक्विड कूलिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे ज्यामुळे उच्च दाबाच्या उर्जेचा परिणामकारक रीतीने वापर केला जातो आणि त्यामुळे परीचालन खर्च कमी होतो. संशोधकांच्या लाभासाठी सिस्टीमवर वातावरण आणि हवामान, बायोइन्फॉरमॅटिक्स, कॉम्प्युटेशनल केमिस्ट्री, मॉलिक्युलर डायनॅमिक्स, मटेरिअल सायन्सेस, कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स इत्यादीसारख्या यंत्रणा विविध वैज्ञानिक क्षेत्रांमधील अनेक अनुप्रयोगांसाठी यामध्ये स्थापित केलेल्या आहेत. ही उच्चस्तरीय संगणकीय प्रणाली संशोधन कार्यासाठी संशोधकांना एक वरदानच ठरेल.

परम अनंत सुपरकॉम्प्युटिंग सुविधेचा गांधीनगर येथील आयआयटीला संशोधन आणि विकास (R&D) उपक्रमांचा पाठपुरावा करण्यासाठी संस्थेतील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बहुविद्याशाखीय क्षेत्रांमध्ये, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML)या ज्ञानशाखांसाठीच केवळ मर्यादित न राहता आणि डेटा सायन्स; कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स (CFD); जीनोम सिक्वेन्सिंग आणि डीएनएच्या अभ्यासासाठी जैव-अभियांत्रिकी; संगणकीय जीवशास्त्र आणि जैव सूचना विज्ञान जीन नेटवर्कचा अंदाज आणि शोध यासाठी अधिक लाभदायी ठरेल, तसेच अणू आणि आण्विक विज्ञान जे एखादे औषधविशिष्ट प्रथिनाशी कसे जोडते हे समजण्यास मदत करते; हवामान बदल आणि पर्यावरणीय अभ्यास यातून विपरीत हवामानाचा अचूक अंदाज आणि चक्रीवादळाचा अंदाज व्यक्त करु शकणारी प्रारुपे, ऊर्जा अभ्यासात डिझाइन सिम्युलेशनसाठी आणि ऊर्जा रूपांतरण उपकरणांचे विविध स्केलवर ऑप्टिमायझेशन करण्यासाठी देखील मदत करतील; फायर डायनॅमिक्स सिम्युलेशन; नॅनो तंत्रज्ञान; रोबोटिक्स; उपयोजित गणित; खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र; भौतिक विज्ञान; क्वांटम मेकॅनिक्स; त्याचप्रमाणे इमारती, पुलांचे स्ट्रक्चरल मेकॅनिक्सचा (बांधकाम)समजून घेण्यासा
ठी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि स्ट्रक्चरल मेकॅनिक्सचा अभ्यास; आणि जटिल रचना यासाठी देखील मदत करणारे ठरेल.

एनएसएमच्या आदेशानुसार या संगणकीय शक्तीचा एक भाग जवळच्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना देखील सामायिक केला जाईल. यानंतर, एनएसएम या सुपरकॉम्प्युटिंग सुविधेचा वापर करून अनेक उपायोजित संशोधन प्रकल्प प्रायोजित करणार आहे,ज्यात संशोधक आणि इतर भारतीय संस्था आणि उद्योगांचा समावेश करण्यात येईल. एकंदरीत, ही सुपरकॉम्प्युटिंग सुविधा भारतीय शैक्षणिक आणि उद्योगांमधील संशोधन आणि विकास उपक्रमांना जगात सन्मानाच्या स्थानावर पोहोचण्यासाठी मोठी चालना देईल.

एनएसएमअंतर्गत, आजपर्यंत देशभरात 24 पेटाफ्लॉप्सच्या एकूण गणनक्षमतेसह 15 सुपर कॉम्प्युटर प्रस्थापित केले गेले आहेत. हे सर्व सुपर कॉम्प्युटर भारतात तयार केलेले असून ते स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या सॉफ्टवेअर स्टॅकवर कार्यरत आहेत.


 G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829605) Visitor Counter : 237


Read this release in: English , Urdu , Hindi