PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
25 MAY 2022 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 25 मे 2022
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 192.67 (1,92,67,44,769) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,43,14,249 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.31 (3,31,70,120) कोटींपेक्षा अधिक किशोरांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रीकॉशन मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.
भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 14,971 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे.
गेल्या 24 तासात 1,977 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,26,02,714 झाली आहे.
गेल्या 24 तासात 2,124 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 4,58,924 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.79 (84,79,58,776) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.49% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.46% आहे.
इतर अपडेटस्
• केंद्र सरकारने सुमारे 193.53 (1,93,53,58,865) कोटी लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 16.14 (16,14,73,595) कोटी न वापरलेल्या उपयोगी मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.
महत्त्वाचे ट्विट्स
***
N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1828317)
आगंतुक पटल : 149