विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
Posted On:
24 MAY 2022 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2022
भारतातील रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर लवकरच केला जाऊ शकेल. रस्त्यावरील धोके ओळखून, वाहनांच्या संभाव्य धडकेविषयी चालकांना वेळेत जागृत करणे, रस्ते सुरक्षेत अनेक सुधारणा करणे यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता दृष्टिकोन असलेला प्रकल्प रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर कमी करण्याच्या उद्देशाने नागपूर शहरात अमलात आणला जात आहे.
नागपूर इथला हा प्रकल्प ‘तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीद्वारे रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक उपाययोजना’ [‘Intelligent Solutions for Road Safety through Technology and Engineering’ (iRASTE)],वापरुन, चालकांना जागृत करेल. तसेच वाहन चालविताना अपघात प्रवण परिस्थिती शोधेल आणि या बाबत वाहन चालकांना प्रगत चालक सहाय्य व्यवस्थेच्या [Advance Driver Assistance System (ADAS)] माध्यमातून माहिती देईल. सगळ्या रस्त्यांवरील वाहतुकीचे आणि इतर माहितीचे विश्लेषण करून या प्रकल्पात ‘त्रुटी असलेली ठिकाणे’ शोधली जातील. काही ठिकाणे म्हणजे जिथे सहसा लक्ष दिले जात नाही ती जीवघेण्या अपघातांची केंद्रे बनू शकतात. या व्यवस्थेत रस्त्यांवर सातत्याने देखरेख ठेवली जाते आणि आरेखन अभियांत्रिकीच्या मदतीने अपघातप्रवण ठिकाणे तसेच रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जाते.
iRASTE प्रकल्प आय-हब फाऊंडेशन , भारतीय तंत्रज्ञान संस्था, हैद्राबाद, तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्र, जे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने सुरु करण्यात आलेल्या डाटा बँक्स आणि डाटा सेवा अंतर्गत, आंतरशाखीय सायबर भौतिक व्यवस्था राष्ट्रीय मिशन, अप्लाइड कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेच्या (INAI) मदतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात सीएसआयआर-सीआरआरआय आणि नागपूर महानगरपालिका यांचाही सहभाग आहे तसेच महिंद्रा आणि इंटेल उद्योग यात भागीदार आहेत.
हे केंद्र मूळ आणि अप्लाईड विस्तारित डाटा चलित तंत्रज्ञानाचा समन्वय, एकत्रीकरण आणि देशभरात प्रसार करण्याचे काम करते. भविष्यात संशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्राला, मुख्यत्वे करून लहान अंतराची वाहतूक, आरोग्यसेवा तसेच स्मार्ट इमारती यासाठी याचा उपयोग व्हावा, यासाठी हे असे महत्वाचे स्रोत तयार करण्याचा प्राथमिक उद्देश आहे
iRASTE प्रकल्प आणखी एकमेवाद्वितीय असण्याचे आणखी एक कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान वापरून भारतीय परिस्थिती अनुरूप आराखडा तयार करून प्रत्यक्ष उपाय शोधले जात आहेत. नागपूर शहरात सुरवातीला अंमलबजावणी करून iRASTE प्रकल्प इतर शहरात देखील वापरण्याचे ध्येय आहे.
S.Kulkarni/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827950)
Visitor Counter : 937