सांस्कृतिक मंत्रालय

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे दोन प्रमुख प्रदर्शनांचे केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी केले उद्घाटन

Posted On: 18 MAY 2022 9:50PM by PIB Mumbai

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) या कलादालनाच्या हस्तांतरण आणि क्षेत्रज्ञ या दोन प्रमुख प्रदर्शनांचे केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर विभागाचे विकास मंत्री मंत्री जी किशन रेड्डी यांनी उद्घाटन केले.

  “भारतातील अग्रगण्य कलासंस्था असलेल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट,  येथे बोलायला मिळणे ही देखील खूप अभिमानाची गोष्ट आहे. संस्थेची स्थापना 1954 मध्ये झाली, त्यावेळी आधुनिक भारताच्या कलेला समर्पित,  अशा प्रकारचे ते एकमेव संग्रहालय होते. एनजीएमए कलादालन नंदलाल बोस यांच्यासह 11 नामवंत कलाकारांना समर्पित आहे.  नंदलाल बोस यांच्या आई क्षेत्रमणी देवी या मातीची खेळणी बनवत असत आणि त्यांच्याकडूनच नंदलाल बोस यांना प्रेरणा मिळाली,” असे जी किशन रेड्डी यांनी यावेळी सांगितले.

सांस्कृतिक मंत्रालयाने यावेळी दोन उपक्रमांची सुरुवात देखील केली –  या अंतर्गत Mu(See)um हॅकेथॉनची घोषणा केली आणि म्युझियम ऑफ इंडियाहे मोबाईल अ‍ॅप सुरु करण्यात आले.  संग्रहालय-केंद्रित समस्यांच्या निवारणासाठी उपाययोजना करण्याकरता देशातील सर्वात प्रतिभावंत शोधण्याचे पहिले उद्दिष्ट आहे, तर दुसरे उद्दिष्ट देशभरातील 8 राष्ट्रीय संग्रहालयातील 750 डिजीटाइज्ड वस्तूंना प्रवेश देऊन संग्रहालयांच्या भौतिक आणि भौगोलिक सीमा पुसून टाकण्याचे आहे.

भारतात 1000 हून अधिक संग्रहालये आहेत त्यांचे केन्द्र सरकारमधील विविध मंत्रालये व्यवस्थापन करतात. संस्कृती मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय, संरक्षण मंत्रालयपरराष्ट्र मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, भारतीय खाद्य निगम ही मंत्रालये केन्द्रीय पातळीवर संग्रहालयांचे व्यवस्थापन करतात.

 

***

S.Thakur/VD/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826609) Visitor Counter : 135


Read this release in: English , Urdu , Hindi