दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारत-जपान आयसीटी सर्वसमावेशक सहकार्य आराखडा अंतर्गत 7 वी जपान-भारत आयसीटी संयुक्त कृतीगटाची बैठक संपन्न

Posted On: 13 MAY 2022 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2022

7 वी जपान-भारत आयसीटी संयुक्त कृतीगटाची बैठक 13 मे 2022 रोजी आभासी स्वरूपात झाली. दूरसंचार विभागाचे अतिरिक्त सचिव व्ही.एल. कांथा राव आणि जपानचे धोरण समन्वय (आंतरराष्ट्रीय व्यवहार) उपमंत्री सासाकी युजी यांनी बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. दोन्ही देशाचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि उद्योग, संशोधन आणि विकास आणि शैक्षणिक क्षेत्रातील इतर संबंधित  या बैठकीला उपस्थित होते.

मार्च 2022 मधील भारत- जपान शिखर बैठकीचे स्मरण करून, दोन्ही देशांनी  भारत-जपान डिजिटल भागीदारी अंतर्गत वाढत्या सहकार्याची गरज ओळखून डिजिटल परिवर्तनासाठी संयुक्त प्रकल्पांना चालना देऊन डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, भारतीय माहिती तंत्रज्ञान  व्यावसायिकांना जपानमध्ये आणि जपानी कंपन्यांमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  तसेच आयओटी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी मदत केली जाणार आहे. संयुक्त कृतीगटाची चर्चा 5G, ओपन RAN, दूरसंचार नेटवर्क सुरक्षा, समुद्राखाली  केबल यंत्रणा  आणि क्वांटम कम्युनिकेशन्स सारख्या विविध क्षेत्रात  सहकार्य वृद्धिंगत करण्यावर  केंद्रित होती.

7 व्या संयुक्त कृतीगटाच्या बैठकीत  सहभागी झालेल्यांमध्ये  भारत आणि जपानमधील सरकारी अधिकारी, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील संबंधितांचा  समावेश होता. बैठकीत ओपन RAN, मॅसिव्ह एमआयएमओ, क्वांटम कम्युनिकेशन्स, कनेक्टेड कार्स, 5G वापर  आणि 6G संशोधनांवरील सर्वोत्तम पद्धती आणि अनुभव यावर चर्चा करण्यात आली. 7व्या संयुक्त कृतीगटाने  भारत आणि जपानमधील सहकार्य कराराच्या  (MoC) चौकटी अंतर्गत या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यास मान्यता दिली.

 
S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825224) Visitor Counter : 212


Read this release in: English , Urdu , Hindi