दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस ) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे टपाल विभागाचे आवाहन
Posted On:
09 MAY 2022 6:31PM by PIB Mumbai
गोवा, 9 मे 2022
टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस ) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवाराला 02.05.2022 ते 05.06.2022 या कालावधीत http://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.
उमेदवारासाठी असलेल्या अन्य अटी पुढीलप्रमाणे आहेत: i] माध्यमिक शाळा म्हणजे इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ii] जीडीएस श्रेणींसाठी इच्छुक उमेदवारांना केंद्र सरकार/राज्य सरकार/विद्यापीठे/मंडळ /खाजगी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही संगणक प्रशिक्षण संस्थेकडून किमान 60 दिवसांच्या मूलभूत संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या प्रकरणांमध्ये उमेदवाराने दहावी किंवा बारावी किंवा इतर कोणत्याही उच्च शैक्षणिक स्तरावर संगणक हा विषय म्हणून अभ्यासला असेल, अशा प्रकरणांमध्ये मूलभूत संगणक ज्ञान प्रमाणपत्राची ही आवश्यकता शिथिल असेल अशा प्रकरणांमध्ये वेगळे प्रमाणपत्र जोडण्याची गरज नाही. उमेदवार किमान दहावीपर्यंत स्थानिक भाषेतून शिकलेला असावा. गोवा राज्याची स्थानिक भाषा म्हणून कोकणी/मराठी ग्राह्य धरली जाते.
ऑनलाइन अधिसूचना जारी केल्याची तारीख म्हणजेच 02.05.2022 नुसार, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी 18 ते 45 वर्षे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी [अनुसूचित जाती/जमाती/ इतर मागासवर्ग प्रवर्गाअंतर्गत समाविष्ट नसलेले उमेदवार आणि ज्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. 8.00 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा या अनुषंगाने, त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी विहित स्वरूपात उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे] वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
निवडलेल्या उमेदवाराने निवड झाल्यानंतर एक महिन्याच्या आत आणि रुजू होण्यापूर्वी टपाल कार्यालयाच्या टपाल ग्राम /वितरण अधिकार क्षेत्रात वास्तव्याला आले पाहिजे. या पदासाठी अर्ज करण्याच्या उद्देशाने किंवा त्या पदावर निवडीच्या उद्देशाने, ही अट उमेदवारासाठी पूर्व-आवश्यक नाही आणि निवड झालेल्या उमेदवाराने निर्धारित वेळेत विहित अटींचे पालन करणे आवश्यक आहे. i] शाखा पोस्ट मास्तर (बीपीएम) आणि इतर ग्राम डाक सेवक (जीडीएस) पदांवरील नियुक्तीसाठी निवडलेल्या उमेदवारांना 1,00,000/- रुपयांच्या निष्ठा बंधपत्राच्या (फिडेलिटी बॉण्ड) स्वरूपात हमी सादर करणे आवश्यक आहे.अधिक तपशिलांसाठी आणि ऑनलाइन अर्जाच्या नमुन्यासाठी उमेदवाराला http://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करावी लागेल.
* * *
PIB Panaji | S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823949)
Visitor Counter : 205