रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपारीक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आरसीएफच्या ट्रॉम्बे युनिट मध्ये खतांच्या नवीन श्रेणींचे केले उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 07 MAY 2022 5:33PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपारीक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आज मुंबईत चेंबूर इथल्या

आरसीएफच्या ट्रॉम्बे युनिटला भेट दिली. तिथे त्यांनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) - सुफलाच्या 10:26:26 नवीन उत्पादित एनपीके श्रेणीचे उद्घाटन केले.

आरसीएफने 2021-2022 मधे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे मंत्री महोदयांनी कौतुक केले, कोरोना महामारीच्या कठीण काळात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी  अभिनंदन केले.  या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत संकल्पना सुनिश्चित करण्यासाठी आरसीएफने उचललेल्या विविध पावलांचेही त्यांनी कौतुक केले. आरसीएफ संशोधन आणि विकास विभागाने नव्याने विकसित केलेले उत्पादन विपुला  10:10:10 चेही त्यांनी उद्घाटन केले.

सुफला 10:26:26 हे संतुलित खत असून ते सर्व पिकांसाठी वापरण्यास योग्य आहे.

***

N.Chitale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1823517) आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Kannada