पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
प्रसिद्धीपत्रक
Posted On:
04 MAY 2022 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2022
अलीकडील लेख, विशिष्ट प्रसारमाध्यमांद्वारे एकसारख्याच लेख मालिकेचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर असे दिसून आले आहे की, खोट्या "स्रोत-आधारित" वृत्तांच्या माध्यमातून रशियाकडून भारतीय तेल कंपन्यांद्वारे केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या नियमित खरेदी संदर्भात निष्कर्ष काढण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याच्या अशा उघड गैरवापराकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते परंतु या प्रकरणात ते शक्य नाही कारण आधीच नाजूक अवस्था असलेल्या जागतिक तेल बाजाराला आणखी अस्थिर करण्याच्या पूर्व-नियोजित प्रयत्नाचा हा एक भाग आहे.
चुकीचा वृत्तांत तयार करण्यासाठी लेखातील निवडक माहितीची तुलना स्पष्टपणे रचलेल्या एका मोहिमेचा एक भाग आहे. लेखात अनेक अंगभूत विरोधाभास देखील आहेत.
तेलाच्या सुमारे 5 दशलक्ष बॅरल्सचा दैनंदिन वापर आणि 250 एमएमटीपीएच्या शुद्धीकरण क्षमतेसह भारताच्या ऊर्जेच्या गरजा प्रचंड आहेत.ऊर्जा सुरक्षेसाठी आणि प्रत्येक नागरिकाला ऊर्जा न्याय देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, भारतीय ऊर्जा कंपन्या जगातील सर्व प्रमुख तेल उत्पादकांकडून खरेदी करतात. सरासरी, दररोज 60 दशलक्ष ग्राहकांना पेट्रोल पंपावर सेवा देण्याचे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे. आव्हानात्मक काळ असूनही, आपल्या नागरिकांना परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देणे हे सरकारसाठी महत्त्वाचे आहे.
आपली आघाडीची 10 आयात स्थाने बहुतेक पश्चिम आशियातील आहेत.अलिकडच्या काळात, कच्च्या तेलाच्या आयातीपैकी जवळपास 7.3% बाजारपेठेसह सुमारे 13 अब्ज डॉलर्स मूल्याच्या ऊर्जा आयातीद्वारे अमेरिका भारतासाठी कच्च्या तेलाचा एक प्रमुख स्रोत बनला आहे,
काही तेल पुरवठादारांकडून वाढवण्यात आलेल्या दरामध्ये तेल घेण्यासाठी भारताला बंधने आली आहेत, त्यामुळे भारत त्याच्या खरेदीच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणत आहे. दरम्यान, भारतातील ऊर्जेची मागणी स्थिर आहे. सध्याच्या किंमतीच्या स्तरावर , नजीकचे शेजारील अनेक देश इंधनाच्या मोठ्या प्रमाणातील महागाईमुळे तीव्र इंधन टंचाई आणि अराजकतेचा सामना करत आहेत.
सातत्यपूर्ण आधारावर, गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय ऊर्जा कंपन्या रशियाकडून ऊर्जा पुरवठा स्वीकारत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून.परिचालनविषयक आवश्यकतांसह विविध कारणांमुळे वार्षिक आकडेवारी भिन्न असू शकते.जर अचानक, आता, कच्च्या तेलाचा एक मोठा आयातदार म्हणून, भारताने आपल्या विविध स्त्रोतांकडून माघार घेतली तर,आधीच मर्यादित असलेल्या बाजारपेठेत उर्वरित गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर आणखी अस्थिरता आणि अस्थैर्य निर्माण होईल आणि आंतरराष्ट्रीय किंमती वाढतील.
मात्र, याउलट स्थिती असल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न करूनही,भारताच्या एकूण वापराच्या तुलनेत रशियाकडून होणारी ऊर्जा खरेदी अत्यल्प आहे. ज्या पत्रकारांना सतत विकसित होत असलेल्या ऊर्जा परिस्थितीची अधिक चांगली माहिती मिळवायची आहे त्यांना रशियाकडून पुरविल्या जाणाऱ्या ऊर्जेचे प्रमुख ग्राहक असलेल्या देशांकडे जगाच्या इतर भागांकडे लक्ष वळवण्याचा सल्ला दिला जात आहे.
भारतातील अधिकृत ऊर्जा व्यवहारांचे राजकारण करता येणार नाही.उर्जेच्या स्रोतांवर निर्बंध लादणे बाकी आहे. असत्यापित स्रोतांच्या आधारे, करण्यात येणाऱ्या अशा पत्रकारितेचा स्वतःचा वाचक वाढवण्याचा हेतू असतो. जबाबदारीने वादविवादाची माहिती देण्याऐवजी, अशी सनसनाटी वृत्तं, स्वार्थासाठी फायदा घेणाऱ्यांचा हेतू साधतात ज्यामुळे जागतिक आर्थिक सुधारणांवर नकारात्मक परिणाम होतो.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822786)
Visitor Counter : 261